Eknath Khadse
Eknath KhadseSaam tv

Eknath Khadse: बाळासाहेबांची पुण्याई दोघांच्‍या भानगडीत मोडली गेली; एकनाथ खडसेंचा टोला

बाळासाहेबांची पुण्याई दोघांच्‍या भानगडीत मोडली गेली; एकनाथ खडसेंचा टोला
Published on

जळगाव : आयुष्‍यभर ज्‍या बाळासाहेब ठाकरेंनी संघर्ष करत शिवसेना (Shiv Sena) वाढविली. धनुष्‍यबाणाला वेगळी प्रतिष्‍ठा निर्माण करून दिली होती. परंतु, आज शिवसेना दुभंगली गेली आहे. हे राज्‍याच्‍या दृष्‍टीने हिताचे नाही. मुळात बाळासाहेबांची पुण्याई दोघांच्‍या भानगडीत मोडली गेली आहे; अशी प्रतिक्रीया राष्‍ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिली आहे. (Jalgaon Eknath Khadse News)

Eknath Khadse
Jalgaon: प्रेयसीसोबत नवऱ्याला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडले, संतापलेल्या बायकोनं असं काही केलं की...

जळगावात (Jalgaon) राष्‍ट्रवादीच्‍या एका कार्यक्रमादरम्‍यान खडसे यांनी माध्‍यमांशी संवाद साधला. खडसे यांनी सांगितले, की धनुष्‍यबाण गोठविल जाणे अर्थात शिवसेना संपली आहे. हे राज्‍याच्‍या दृष्‍टीने हिताचे नाही. कारण प्रमुख पक्षाचे तुकडे पडले असून कमजोर झाली आहे. या दृष्‍टीने राष्‍ट्रवादी (NCP) मजबूत आहे. शिवसेना कमजोर पडल्‍यामुळे भाजपला (BJP) मजबूत करण्याची संधी मिळाली असल्‍याचे देखील खडसे यांनी सांगितले.

चुक इतकी मोठी नको की पक्ष संपेल

शिवसेनेच्‍या बाबतीत एकमेकांना दोष देण्यात अर्थ नाही. ठाकरे– शिंदेंनी काय केले. यापेक्षा धनुष्‍यबाण मोडला हे नाकरता येत नाही. चुका या होत राहतात. परंतु, एखादी चुक इतकी मोठी नसावी की यामुळे पक्ष संपून जाईल; असा अप्रत्‍यक्ष टोला देखील त्‍यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. आता न्‍यायालयाचा काय निर्णय लागेल, याकडे लक्ष आहे. परंतु, न्‍यायालय वेगळा निर्णय देईल असे वाटत नसल्‍याचे देखील त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com