साज चढविण्यापुर्वीच बैलाचा मृत्‍यू; दुर्देवी घटनेने शेतकरी कुटुंबाचे अश्रू थांबेना

साज चढविण्यापुर्वीच बैलाचा मृत्‍यू; दुर्देवी घटनेने शेतकरी कुटुंबाचे अश्रू थांबेना
Farmer
Farmer
Published On

मेहुणबारे (जळगाव) : एकीकडे वर्षभर शेत मालकाला साथ देणाऱ्या सर्जाराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा आज सर्वत्र साजरा होत होता. पण तमगव्हाण येथे आज सकाळी वादळी वाऱ्यामुळे तुटलेल्‍या वीजेच्‍या ताराला स्‍पर्श झाल्‍याने शॉक लागून बैलाचा मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. (death of the ox before the harness; The unfortunate incident will not stop the tears of the farmer family)

तमगव्हाण (ता.चाळीसगाव) येथे गावलगत असलेल्या माळशेवगा रस्त्याच्या बाजुला आज (ता. ६) सकाळी महावितरणच्या ट्रान्सफरवरील वीजेचा तार वादळामुळे तुटून खाली पडला. यामुळे गावातील शेतकरी लक्ष्मण आनंदा सानप हे बैलगाडीने शेताकडे जात असतांना त्यांच्या बैलाचा स्पर्श तुटलेल्या वीजेच्या तारेला लागून सदर बैल हा जागीच मरण पावला.

Farmer
बैलपोळा : गावची चारशे वर्षाची अशी होती परंपरा मात्र

पोळ्याच्‍या दिवशीच साथ सोडली

दुर्देव घटनेने शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे. या प्रकरणी तळेगाव स्बटेशनचे वायरमन छोटु धोंडू पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. एकीकडे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण सर्वत्र साजरा होत असतांनाच बैलाचा शॉक लागून मृत्यु झाल्याने या शेतकऱ्यावर मोठे दुख कोसळले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com