अजिंठा लेणीत पर्यटक प्रवेशाची मर्यादा केली कमी

अजिंठा लेणीत पर्यटक प्रवेशाची मर्यादा केली कमी
अजिंठा लेणी
अजिंठा लेणीअजिंठा लेणी
Published On

तोंडापूर (जळगाव) : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत (Ajanta Caves) एक हजार पर्यटकांना प्रवेश मर्यादा करण्यात आली आहे. यापूर्वी दोन हजाराची मर्यादा होती. नवीन आदेशानुसार प्रवेशाची मर्यादा कमी करण्यात आली आहे. (coronavirus-Ajanta-Caves-Lower-tourist-access-limit)

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना लेणी सकाळी ९ ते ४ दुपारी वाजेपर्यंतच खुली राहणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबाद जिल्‍हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सुधारित आदेश काढत जिल्ह्यातील पर्यटनस्थळाला शासन आदेशानुसार सकाळी ७ ते ४ पर्यंत सुरु राहण्याची परवानगी दिली आहे. तर सायंकाळी पाच वाजेनंतर कुठल्याही व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

अजिंठा लेणी
वीजयंत्रणेवर कर लादण्याचा ग्रामपंचायत, पालिकांना अधिकार नाही- महावितरण

दोन टप्‍प्‍यात प्रवेश

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला त्यातून सुट देण्यात येवून सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंतच खुली राहणार आहे. सकाळच्या सदरात पाचशे पर्यटकांना प्रवेश दिला जाईल. तर दुसऱ्या सदरात पाचशे पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे दिवसभरात फक्त एक हजार पर्यटकांची मर्यादा करण्यात आली आहे.

दुपारनंतर तिकिट बुकिंगच बंद

दुपारी तीन वाजता तिकिट बुकिंग बंद करून पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नियमित साडेनऊला उघडून सायंकाळी साडेपाचला बंद होणारी अजिंठा लेणी आता ९ ते ४ पर्यंतच खुली राहणार आहे. जळगाव– औरंगाबाद जिल्ह्यातील येणाऱ्या पर्यटकांना लेणी पाहण्यासाठी पुरेशा वेळ मिळणार आहे. मात्र पुणे, नागपूर, मुंबई व इतर राज्यातील हैदराबाद, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा येथील पर्यटकांना लेणी पाहण्यासाठी वेळ कमी पडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com