जळगाव : जिल्हा रुग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात नव्याने सहा कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे सध्या १६ कोरोनाबाधित रुग्ण असून ते कोवीड रूग्णालयात (Hospital) उपचार घेत आहेत. (Corona is growing in Jalgaon district Infected six in a single day)
राज्यात कोरोना (Corona) बाधितांचा आकडा वाढत आहे. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात देखील कोरोना बाधित आढळून येत आहेत. गेल्या दोन ते तीन महिन्यात कोरोना जवळपास आटोक्यात आला होता. आता कोरोनाच्या नव्या लाटेत रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या १६ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५१ हजार बाधित
जळगाव जिल्ह्यात मंगळवारी सहा बाधित आढळून आले. यात (Bhusawal) भुसावळ तालुक्यातून ३, चोपडा तालुका- १, यावल- २ असे एकूण ६ कोराना बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ५१ हजार ५७५ कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ९ ६८ रूग्ण बरे होवून घरी परतले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.