जिल्ह्यात ५ जूननंतरच पावसाची हजेरी; तापमान पाच अंशाने खाली

मॉन्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्यानंतर वाऱ्याचा वेग वाढल्याने तापमानात घट झाली आहे
जिल्ह्यात ५ जूननंतरच पावसाची हजेरी; तापमान पाच अंशाने खाली
Published On

जळगाव : जिल्ह्यात काही दिवसांपासून वाऱ्याचा वेग वाढला आहे. तापमानातही घट झाली आहे. तापमानाने हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. राज्यात सोमवारपासून (ता. ३०) पूर्वमोसमी पावसाचा अंदाज आहे. जळगावात (Jalgaon) मात्र पाच जूनपर्यंत तरी पाऊस पडणार नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. (jalgaon news come of rains after 5th June)

जिल्ह्यात ५ जूननंतरच पावसाची हजेरी; तापमान पाच अंशाने खाली
उष्माघाताने एकाचा मृत्यू; कामाच्‍या शोधात गाठले होते जळगाव

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात वाऱ्यांचा वेग वाढला आहे. वाऱ्यांचा वेग २९ ते ५६ किलोमिटर प्रतितास असा आहे. कधी हळूवार तर कधी वेगाने वारे वाहतात. यामुळे कडक तापमानाने (Temperature) हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. रविवारी (ता. २९) ४० अंश तापमान नोंदवले गेले. गेल्या आठ दिवसांपासून तापमान ४५ ते ४६ अंशादरम्यान होते. मॉन्सूनचे (rain) केरळमध्ये आगमन झाल्यानंतर वाऱ्याचा वेग वाढल्याने तापमानात घट झाली आहे.

शेती झाली तयार

खरीपातील बीटी बियाणे विक्री एक जूनपासून सुरू होईल. असे असले तरी पेरणीसाठी सर्वच शेतकऱ्यांनी (Farmer) शेते तयार करून ठेवली आहे. आता त्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. पाऊस पडल्याने शेतातील जमिनीतील उष्णता जाऊन जमीन गार होते. शेतातील मातीचे मोठे खडे विरघळून जातील. त्यानंतर नांगरणी करून शेत पेरणी योग्य बनविता येणार आहे. यामुळे पाऊस केव्हा पडतो व शेत एकदाचे तयार करतो, असे शेतकऱ्यांना झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com