पाटणादेवी जंगलातील रात्रीचा थरार..कुऱ्हाड फांदीत अडकल्याने वाचला वनरक्षक

पाटणादेवी जंगलातील रात्रीचा थरार..कुऱ्हाड फांदीत अडकल्याने वाचला वनरक्षक
पाटणादेवी
पाटणादेवी
Published On

चाळीसगाव : पाटणादेवी (ता. चाळीसगाव) जंगलात घनदाट झाडीतून दीड तासाची पायपीट करीत चंदनचोरांना पकडण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकावर रात्रीच्या किर्रर्र अंधारात एका चंदनचोराने त्याच्याजवळची धारदार कुऱ्हाड वनरक्षकाच्या दिशेने फेकून मारली. सुदैवाने ही कुऱ्हाड झाडाच्या फांदीत अडकल्याने अनर्थ टळला. या दरम्यान, अंधाराचा फायदा घेत चंदनचोर त्यांच्याजवळील साहित्य सोडून पसार झाले. घडलेल्या या घटनेमुळे चंदन तस्करीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (jalgaon-news-chalisgaon-patnadevi-forest-aria-Sandalwood-smugglers-and-forest-department-staff-attack)

कारवाईत ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता, असे सर्पतज्ज्ञ तथा मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांनी सांगितलेली आपबिती अंगावर काटा आणते. जंगलात घडलेल्या या घटनेबद्दल श्री. ठोंबरे यांनी सांगितले, की शनिवारी (३१ जुलै) पाटणादेवीच्या जंगलात काही चंदन तस्कर शिरल्याची माहिती आपल्याला मिळाली. त्यानुसार, तातडीने या संदर्भात औरंगाबाद येथील वन्यजीवचे विभागीय वनाधिकारी विजय सातपुते व कन्नड येथील सहायक वनसंरक्षक आशा चव्हाण यांनी ही माहिती दिली. श्री. सातपुते हे कामानिमित्त बीड दौऱ्यावर होते. त्यांची खूप इच्छा असूनही त्यांना घटनास्थळी पोहचणे अशक्य होते. त्यामुळे त्यांनी आशा चव्हाण यांना नियोजन करायला सांगितले. श्रीमती चव्हाण यांनी नागदचे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले आणि राजेश ठोंबरे यांना कॉन्फरन्स कॉलवर घेऊन योग्य त्या सूचना दिल्या. वेळेचे गणित बघता ठरलेल्या जागी सर्वांनी पोहचणे गरजेचे होते. औरंगाबाद येथून श्रीमती चव्हाण, नागद येथून ढोले व त्यांचे निवडक कर्मचारी, कन्नड येथून वनपाल श्री. मोरे व त्यांचे काही सहकारी तसेच चाळीसगाव येथून राजेश ठोंबरे, वनरक्षक अजय महिरे, राम डुकरे आणि पाटणादेवी जंगलाची खडा न खडा माहिती असलेले वनमजूर कैलास चव्हाण असे सर्व रात्री दीडच्या सुमारास ठरलेल्या जागी पोहचलो.

पाटणादेवी
झोपेत सापाचा दंश..तीन वर्षीय बालिकेचा काही क्षणातच मृत्‍यू

चंदनचोराने फेकली कुऱ्हाड

अभयारण्याच्या दिशेने चालायला सुरुवात करताना चिखलातून वाट काढत चढउतार करीत गुढघाभर उंचीच्या गवतातून झपाझप पावले टाकत जवळपास दीड तासाच्या पायपीट करीत दाट झाडी असलेल्या जंगल भागात सर्व पोहचले. तेव्हा रात्रीचे तीन वाजले होते, दोन टीम करुन कोणी कुठे थांबायचे, चंदन तस्कर दिसल्यावर काय इशारा करायचा, त्यांच्याकडे असणाऱ्या घातक हत्यारापासून स्वतःला कसे वाचवायचे यांचे नियोजन करीत असतानाच एका घळीतून चार जण अचानक समोर आले. त्यातील एकाने बॅटरी लावून समोर कोण आहे हे बघण्याचा प्रयत्न केला. वनरक्षकाला वाटले, की आपल्याच माणसाने बॅटरी लावली. तेवढ्यात उजेडात श्रीमती चव्हाण यांना खात्री पटली, की हेच चंदन तस्कर आहेत. त्या मोठ्याने ओरडल्या ‘पकडा त्यांना’. असे म्हणताच, सर्व तिकडे धावले. अंधारात एकच गदारोळ झाल्यानंतर चंदन तस्कर त्यांच्याकडील पिशव्या टाकून दाट जंगलाच्या दिशेने धावत सुटले. एका चंदन तस्कराने त्याच्या हातातील धारदार कुऱ्हाड वनरक्षकाला मारुन फेकली. सुदैवाने ती झाडाच्या फांद्यांमध्ये अडकल्याने मोठा अनर्थ टळला. खूप प्रयत्न करुनही चंदन चोर हाती लागले नाही. जंगलात शोधाशोध करताना चंदन चोरांच्या पिशव्या मिळाल्या. एका पिशवीत करवती, कुऱ्हाडी, टॉमी व गलोल आढळले. तर दोन पिशव्यांमध्ये मौल्यवान चंदनाचा गाभा भरलेला होता. ही सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत चंदनचोर पळून जाण्यात यशस्वी झाले असले तरी त्यांच्या मुसक्या आवळल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा विश्‍वास वन कर्मचार्यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com