भीषण अपघात..2 जण जागीच ठार, एक गंभीर

भीषण अपघात..2 जण जागीच ठार, एक गंभीर
accident
accident

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : मालेगाव– चाळीसगाव रस्त्यावर भीषण अपघात झाला. यात दोन जण जागीच ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघात (Accident) एवढा भीषण होता की, दुचाकीचा पुढच्या भागाचा संपूर्ण चुरा झाला. (jalgaon-news-chalisgaon-malegaon-road-accident-two-killed-on-the-spot)

accident
कामावर येण्याचा अल्टिमेटम धुडकावला; पण जळगावातील ८४ कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती

चाळीसगावकडुन मुंबईकडे (Mumbai) जात असलेल्या भरधाव तवेरा गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर चाळीसगाव (Chaligaon) शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघाताची माहिती कळताच शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक हेमंत शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी आले. जखमी व मृतांना तात्काळ रुग्णालयात हलवले.

मृतांत दोघे तरूण

त्यानंतर मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यांच्या खिशात असलेल्या कागदपत्रावरून मृतांची ओळख पटली. सोमवारी सायंकाळी साडेसहाला झालेल्या अपघातातील मृतांमध्‍ये प्रकाश एकनाथ बाविस्कर (वय २५, रा. फुलेनगर चाळीसगाव), तर विजय दगडू मोरे (वय २४, रा. देवळी, ता.चाळीसगाव) हे दोन्ही तरुण जागेवर ठार झाले. तर आदित्य श्रावण शहादेव (रा.आडगाव ता. चाळीसगाव) हा गंभीर जखमी झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com