Leopard Attack: सलग तिसऱ्या दिवशी बिबट्याचा हल्‍ला; चाळीसगाव तालुक्यात पशुसंहार सुरूच

सलग तिसऱ्या दिवशी बिबट्याचा हल्‍ला; चाळीसगाव तालुक्यात पशुसंहार सुरूच
Jalgaon News Leopard
Jalgaon News LeopardSaam tv
Published On

मेहुणबारे (जळगाव) : गिरणा परिसरात थैमान घातलेल्या बिबट्याचे पशुसंहाराचे सत्र सुरूच ठेवले आहे. बिबट्याने बुधवारी (ता. २८) रात्री लोंढे (ता.चाळीसगाव) शिवारातील पाटचारीलगत असलेल्या शेतात वासराचा फडशा पाडल्याची घटना घडली. या बिबट्याचा (Leopard) बंदोबस्त लवकरात लवकर करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. (Jalgaon Chalisgaon Leopard Attack)

Jalgaon News Leopard
Ratnagiri : मुले पळवणारी समजून महिलेला बेदम मारहाण; रत्नागिरीतील धक्कादायक घटना

वरखेडे पाठोपाठ लोंढे शिवारात बिबट्याचे (Leopard Attack) पशुधनावरील हल्ले सुरूच आहेत. लोंढे येथे आठवडाभरात बिबट्याचा हा चौथा हल्ला आहे. लोंढे येथील देवराम चौधरी यांच्या पाटचारीलगत असलेल्या शेतात बिबट्याने वासराचा फडशा पाडला. श्री. चौधरी (Farmer) शेताकडे गेले आज पहाटे असता वासरू रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत पाहून एकदम घाबरून गेले. या भागातील बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला आहे. शिकारीच्या अपेक्षेने बिबट्या पिंजऱ्यात अडकेल, अशी अपेक्षा फोल ठरली आहे.

वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

चाळीसगाव- मालेगाव रस्त्यावरील कळवाडी फाट्याजवळ गुरुवारी (ता.२९) सकाळी रस्त्यावर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती चाळीसगाव वन विभागाला कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र बिबट्याचा मृत्यू वाहनांच्या धडकेत झाला असल्याची माहिती वन विभागाने दिली. दरम्यान हा बिबट्याचा मृत्यू मालेगाव हद्दीत झाला असल्याने त्या बिबट्याचा अंत्यविधी मालेगाव वन विभागाने केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com