३१ डिसेंबर घरातच साजरा करा; जिल्‍हाधिकारी राऊत यांचे जिल्‍हावासीयांना आवाहन

थर्टीफर्स्ट पार्श्वभूमीवर जिल्‍हाधिकारी राऊत यांचे जिल्‍हावासीयांना आवाहन
collector abhijit raut
collector abhijit raut
Published On

जळगाव : कोरोनाचे नवीन रुग्णांची वाढ मोठ्या शहरांमध्ये झपाट्याने होत आहे. त्यामुळे आपल्या शहरात आणि ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढायला फार वेळ लागणार नाही. त्यामुळे ३१ डिसेंबर साजरा करताना काही निर्बंध घातले आहेत. त्‍याचे पालन करून ३१ डिसेबर घरातच साजरा करायचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत केले. (jalgaon news Celebrate December 31 at home Collector abhijit Raut appeal)

collector abhijit raut
थर्टीफर्स्ट पार्श्वभूमीवर नॉनव्हेज दुकानांवर उसळली गर्दी

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी ३१ डिसेंबर घरीच राहून साजरा करायचा आहे. बाहेर येऊन जर साजरा केला; तर बदलत्या वातावरणामुळे आणि कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावामुळे धोका निर्माण होणार आहे. मागील वर्षी कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला असा धोका पत्करायचा नसेल, तर घरी राहूनच ३१ डिसेंबर साजरा करावा.

नियमांचे काटेकोर पालन करा

महत्त्वाचे म्‍हणजे कोरोना प्रतिबंधक नियमांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. लसीकरण ही महत्त्वाची गोष्ट असून १८च्या पुढच्या वयोगटातील नागरिकांनी लसीकरण (Corona Vaccination) करून घेणे गरजेचे आहे. दररोज जिल्ह्यामध्ये वीस ते पंचवीस हजार नागरिकांना लस दिली जात आहे. परंतु, जिल्ह्यामध्ये असे नागरिक आहेत ज्‍यांनी एकही डोस घेतला नाही. त्यांनी तातडीने पहिला डोस घ्यावा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com