जळगाव : देशभरात विशेषत: राज्यात बोकाळलेल्या ऑनलाइन बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये झालेली प्रचंड वाढ आणि चाइल्ड पोर्नोग्राफीचा ऑनलाइन वाढता गोरखधंदा पाहता सीबीआयच्या विविध पथकांतर्फे देशातील १४ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांत सुमारे ७७ ठिकाणी एकाच दिवशी छापे टाकले. यात ८३ आरोपींविरुद्ध २३ गुन्हे दाखल करण्यात आले. या छाप्प्यात महाराष्ट्रातील जळगाव- धुळे जिल्ह्यांचा समावेश असल्याचे सीबीआयच्या अधिकृत प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. (jalgaon-news-CBI-raids-across-the-country-including-Jalgaon-and-Dhule)
सीबीआयच्या या प्रसिद्धी पत्रकान्वये, केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्यूरो अर्थात, सीबीआयकडून पहिल्यांदाच चाइल्ड पोर्नोग्राफीवर धाडसत्र राबवण्यात येऊन काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. सीबीआयच्या पथकाला ओडिशात विरोध झाला. हे छापे दुसर्या दिवशी बुधवारीदेखील सुरूच होते. आदल्या दिवशी मंगळवारी (ता.१६) टाकलेल्या छाप्यांत ताब्यात घेतलेल्या संशयितांच्या चौकशीत ठोस पुरावे आढळून आल्यावर संशयितांवर अटकेची कारवाई होईल. चाइल्ड पोनोग्राफी या अश्लील वेबसाईट आणि अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणप्रकरणी विदेशी नागरिकांच्या धरपकडीसह त्यांचा सहभाग असण्याचे संकेत यापूर्वीच इंटरपोलद्वारे देण्यात आल्याने संबंधित देशांशी संशयितांच्या प्रत्यार्पणासंदर्भात लवकरच संपर्क करणार आहे.
शोषणासह ऑनलाइन धंदा
बालकांचे लैंगिक शोषण करून त्यांचा ऑनलाइन प्रचार प्रसाराचा कोट्यावधीचा धंदा आहे. वाईट प्रवृत्तीच्या जाळ्यात सापडल्याने अल्पवयीन मुलांना अनेक वाईट घटनांना सामोरं जावं लागतंय. ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे ही स्थिती अतिशय भयानक होते. उत्तर प्रदेशातील चित्रकूटमध्ये, तर ऑनलाइन प्लॅटफॉर्मचे संबंध विदेशाशी असल्याचं समोर आलं. चित्रकूटमधील बाललैंगिक अत्याचार प्रकरणात उत्तर प्रदेशातील इंजिनिअरला अटक केली होती.
सीबीआयची खास टीम
सीबीआयने या प्रकरणी एक विशेष टीम बनवली आहे. अशा प्रकरणांवर ही टीम नरज ठेवून आहे. अशा प्रकरणांचा खोलात जावून तपास सुरू आहे. असे जवळपास ५० हून अधिक ग्रुप आहेत. ५००० हून अधिक लोक त्यांच्याशी जुडलेले आहेत. त्यांचे संबंध १०० देशांशी आहेत. या प्रकरणांत ८० हून अधिक लोक सहभागी असल्याचं सीबीआयला तपासात आढळून आलं. हा ग्रुप सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि थर्ट पार्टी होस्टिंग प्लॅटफॉर्मवर लिंक, व्हिडिओ, पोटो आणि पोस्टद्वारे बाललैंगिक शोषणाचा प्रसार करत आहेत. छाप्यांदरम्यान अनेक इलेक्ट्रॉनिक डिवाइस, मोबाइल, लॅपटॉप जप्त करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिल्याचे सांगितले जात आहे.
येथे टाकले छापे
- उत्तर प्रदेश- जालौन, मऊ, चंदौली, वाराणसी, गाझीपूर, सिद्धार्थनगर, मुरादाबाद, नोएडा, झांशी, गाझियाबाद, मुजफ्फरनगर.
- गुजरात- जुनागढ, भावनगर, जामनगर.
-पंजाब- संगरूर, मलेरकोटला, होशियारपूर, पतियाळा
- बिहार- पाटणा, सिवान
-हरियाना- यमुनानगर, पानिपत, सिरसा, हिसार
-ओडिशा- भद्रक, जाजपूर, ढेंनकनाल
-राजस्थान- अजमेर, झुंझु, जयपूर, नागौर
-मध्य प्रदेश- ग्वाल्हेर
-महाराष्ट्र- जळगाव, धुळे, पालघर जिल्ह्यातील सलवड
-हिमाचल प्रदेश- सोलन आणि आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि छत्तीसगडमध्येही सीबीआयने छापे टाकले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.