महिला बचत गट सदस्‍यांची काळी दिवाळी; कर्ज माफीच्‍या मागणीसाठी आंदोलन

महिला बचत गट सदस्‍यांची काळी दिवाळी; कर्ज माफीच्‍या मागणीसाठी आंदोलन
महिला बचत गट
महिला बचत गट
Published On

जळगाव : केंद्र सरकारने महाराष्ट्रातील मायक्रो फायनान्स महिला बचत गटांना दिलेले मार्च २०२० चे कर्ज संपूर्ण माफ करावे. या मागणीसाठी महिला छत गट सदस्य मागील एकवीस दिवसांपासून जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर साखळी धरणे आंदोलन करत आहेत. यात आज काळी दिवाळी साजरी करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. (jalgaon-news-Black-Diwali-for-women-self-help-group-members-Movement-for-debt-waiver)

मोदी सरकारने २२ मार्च २०२० ला कोणतीही पूर्व सूचना तसेच नियोजन शून्य लॉकडाउन केले. संपूर्ण लॉकडाउनचा भारतातील लोकांच्या आयुष्यावर झाला. असा दुष्परिणाम की संपूर्ण भारतीयांना अनेक वर्षे भोगावा लागेल. यामध्ये सर्वात जास्त नुकसान भारतातील असंघटित क्षेत्रातील कामगार मजूर वर्गावर झाला असून या सर्व अराजकतेमध्ये भारतातील असंघटित महिला वर्गाला काय संकटातून जावे लागत आहे. याकडे सरकार आणि प्रशासनाचे लक्ष नाही.

महिला बचत गट
एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; आंदोलकांना हुसकावल्‍यानंतरचा प्रकार

कर्ज माफ करा

महाराष्ट्रातील महिला साधारण मागील बारा ते पंधरा वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध मायक्रो फायनान्सकडून घरगुती उद्योगासाठी साधारण वीस ते पन्नास हजारापर्यंत लोन घेऊन दर हाफ्त्याला किंवा महिन्याला भरत आहोत. परंतु मागील दीड वर्षांमध्ये लॉकडाउनमुळे हातातील काम गेल्‍याने घरातील रोजचा खर्च, घरभाडे, दवाखाना, मुलानंचे शिक्षण कसेबसे करत आहोत. बऱ्याच महिला ह्या परित्यक्ता, विधवा आहेत. तर बऱ्याच महिलांचे पतींचे कोविड काळात मृत्यू झाला आहे. यामुळे आर्थिक भार पेलवत नसल्‍याने महिला बचत गटांचे कर्ज माफ करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com