भाजप आमदार सावकारेंची गाडी परिवहन मंत्र्यांच्‍या नावावर; जळगाव आरटीओचा अजब कारभार

sanjay savkare anil parab
sanjay savkare anil parab
Published On

जळगाव : जिल्ह्यातील भुसावळ मतदार संघाचे आमदार संजय सावकारे यांच्या मालकीची गाडी चक्‍क परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यावरून जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. (jalgaon news BJP MLA sanjay savkare car in the name of Transport Minister anil parab of Jalgaon RTO)

sanjay savkare anil parab
पेटत्या कारमध्ये शिक्षकाचा जळालेला मृतदेह; घातपाताचा संशय

भुसावळ (Bhusawal) मतदान संघाचे आमदार संजय वामन सावकारे (Sanjay Savkare) यांच्या मालकीची १९, सीझेड ५१३०) ही गाडी अन्य कुणालाही विक्री केली नसतानाही २४ डिसेंबर २०२१ रोजी परस्पर ट्रान्सफर करून परिवहन मंत्री अनिल दत्तात्रय परब (Anil Parab) यांच्या नावे केल्याची माहिती उघडकीस आली आहे. आमदार सावकारेंनी ही गाडी विक्री केली नसतांना मंत्री परब यांच्या नावाने नोंदणी कशी केली गेली? असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकारामुळे आरटीओ कार्यालयाचा गलथानपणा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

यापुर्वीही मंत्र्यांच्‍या नावाने दिले लायसन्‍स

यापूर्वी देखील जळगाव आरटीओ (Jalgaon RTO) कार्यालयातून मंत्र्यांच्या नावाने लायसन्स दिले गेले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. असे असतांनाही आता तर चक्‍क आमदारांच्‍या मालकीची गाडी जळगाव आरटीओ कार्यालयात सावकारे यांच्या मालकीची गाडी परिवहन यांच्या नावावर ट्रान्सफर करुन नोंदणी केली गेली आहे.

मग परब जळगाव आरटीओ कार्यालयात आले का?

पहिल्या गाडी मालकाकडून दुसऱ्याच्या नावावर गाडीची नोंद करण्यासाठी प्रत्यक्ष आरटीओ कार्यालयात जावे लागते. अनिल परब यांच्या नावावर नोंदणी केली तर ते प्रत्यक्ष आले होते का? ते जर आले नाही तर त्यांच्या नावावर गाडी ट्रान्सफर होवून नोंदणी झाली कशी? किंवा पहिल्या गाडी मालकाने गाड़ीसाठी कर्ज घेतले असेल तर त्याची एनओसी घेतली होती का? असे नानाविध प्रश्न उपस्थित आहे.

माझ्या मालकीची गाडी परस्‍पर परिवहन मंत्र्याच्‍या नावावर कशी जाते. इतका मोठा भोंगळ कारभार आरटीओ कार्यालयात सुरू आहे. याबाबत चौकशी व्‍हायला हवी.

– संजय सावकारे, आमदार, भुसावळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com