वाघूर धरणावर रेषाळ बगळा, तपकिरी खाटीकचे दर्शन; ६८ जातीच्या ९७२ पक्ष्यांची नोंद

वाघूर धरणावर रेषाळ बगळा, तपकिरी खाटीकचे दर्शन; ६८ जातीच्या ९७२ पक्ष्यांची नोंद
Waghur Dam
Waghur Damsaam tv
Published On

जळगाव : जागतिक पाणथळ प्रदेश दिनानिमित्त पक्षिमित्रांनी वाघूर धरण परिसरात पक्षीगणना केली. त्यात ६८ प्रजातींच्या ९७२ पक्ष्यांची नोंद करण्यात आली. विशेषत: रेषाळ बगळा आणि तपकिरी खाटीक हे हिवाळी पाहुणे म्हणून गणल्या जाणाऱ्या पक्ष्यांची (Bird) नोंद झाली. (jalgaon news Bird Count 972 birds of 68 species recorded at Waghur Dam)

Waghur Dam
चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखानाची मालमत्तासह बँक खाते सील

पक्षी व पर्यावरण यांचा परस्पर संबंध आहे. पाणथळ पक्षांचे अस्तित्व हे पाणथळ जागेच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे. या पार्श्र्वभूमीवर पक्षिमित्र अभ्यासाक शिल्पा गाडगीळ, राजेंद्र गाडगीळ, बाळू महांगडे यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जळगाव (Jalgaon) तालुक्यातील वाघूर धरणावर (Waghur Dam) पक्षीगणना केली.

या पक्षांची झाली नोंद

गणनेत पाणथळ पक्षांत प्रामुख्याने वारकरी २१८, छोटा पाणकावळा ९० सोबत अल्प संख्येने गडवाल, तरंग, थापट्या, भुवई बदक, लालसरी, साधा पाणलाव, नदी सुरय, ठिपकेवाली तुतारी, काळ्या शेपटीचा मालगुजा, कंठेरी चिखला, पाणकाडी बगळा, मोरशराटी, काळा शराटी, शेकाट्या, चिखल्या, हिवाळी सुरय, पांढुरका हरीण, उघड्या चोचीचा करकोचा, आशियाई कवडी मैना, करडा धोबी, हिरवा बगळा, पांढऱ्या भुवईचा धोबी, पांढरे धोबी, युरेशियन दलदल इत्यादी पाणपक्ष्यांची नोंद केली.

प्रजाती वाढल्‍या परंतु, संख्‍या झाली कमी

गेल्या वर्षी ६५ प्रजाती व २ हजारांच्यावर पक्ष्यांची नोंद झाली होती. यावेळी पक्षांच्या प्रजांतींची संख्या वाढली असली तरी पक्ष्यांची संख्या मात्र कमी झाली आहे. यावर्षी ६८ प्रजाती व ९६८ पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. यावर्षी फारसे परदेशातून येणारे पक्षी दिसले नाही. सर्वत्र पाणवठे फुल्ल असल्यामुळे विभागले गेले असावेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com