विसर्जनावेळी गणेश भक्त वाहिला; सुखरूप वाचवुन काढले बाहेर

विसर्जनावेळी गणेश भक्त वाहिला; सुखरूप वाचवुन काढले बाहेर
गणेश भक्त
गणेश भक्त

जळगाव : लाडक्‍या बाप्‍पाला आज निरोप देण्याचा दिवस होता. यामुळे बाप्‍पाचे भक्‍त विसर्जन करत अखेरचा निरोप देत होते. या दरम्‍यान भुसावळ तापी नदी पुलाखाली यावल तालुका हद्दीत भुसावळ येथील गणेश भक्तास नदी प्रवाहात वाहुन जात असतांना शोध व बचाव पथकाने सुखरूप वाचवुन बाहेर काढले. (jalgaon-news-bhusawal-Ganesha-became-a-devotee-Saved-out-safely)

बाप्‍पाला विसर्जन करण्यासाठी जिल्‍ह्यात ठिकठिकाणी व्‍यवस्‍था करण्यात आली होती. काही अनुचित प्रकार होवू नये याकरीता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशाने आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर सिह रावळ यांच्या नेतृत्वाखाली जळगांव आणि भुसावळ येथे जीवरक्षक पथक तैनात होते. त्‍यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव आणि मनपातर्फे मेहरुन तलावावर मनपा अग्निशमन विभाग आणि वन्यजीव संरक्षण संस्थेच्या प्रशिक्षित जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.

नशिब म्‍हणून वाचला जीव

बाप्‍पाचे विसर्जन करण्यासाठी भाविक भुषण इंगळे हे तापी नदीत उतरले. पाण्याचा अंदाज आल्‍याने इंगळे हे प्रवाहात वाहून गेले. यावेळी येथे तैनात असलेले वन्यजीव संरक्षण संस्थेच्या प्रशिक्षित जीवरक्षकांनी गणेश भक्ताचा जीव वाचविला. सुदैवाने दुर्देवी घटना टळली आहे.

ड्रोनद्वारे निगराणी

नदी व तलाव परिसरात तैनात असलेले जीवरक्षक पथकसोबत जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी जीवरक्षक पथकाशी संवाद साधत बोटमध्ये बसून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच लाव परिसरात ड्रोनद्वारे निगराणी ठेवण्यात आली. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडून आली नाही.

गणेश भक्त
पोहायला गेलेले दोघे भाऊ बुडाले; वाघळी येथील घटना

असे होते नियोजन

जीवरक्षक पथक : स्‍कायलेब डिसुझा, योगेश गालफाडे, ऋषी राजपूत, शीतल शिरसाळे, अजीम काझी, बबलू शिंदे, राजेश सोनवणे, सतीश कांबळे, रितेश भोई, चेतन भावसार, रवींद्र फालक तसेच मनपा अग्निशमन विभाग जीवरक्षक पथक देखील तैनात आहेच. सर्व जीवरक्षक सकाळपासून रात्री विसर्जन पूर्ण होईपर्यंत तैनात आहेत. बोट घेऊन नागरिकांना सूचना देखील देत होते.

सर्पमित्र पथकाने रेस्क्यू केले 3 सर्प

जगदीश बैरागी, अभिषेक ठाकूर, सुरेंद्र नारखेडे, निलेश ढाके, शुभम पवार, दुर्गेश आंबेकर, दिनेश कोळी, बापू कोळी, किरण सपकाळे, वासुदेव वाढे, गणेश सोनवणे हे सर्पमित्र कार्यरत होते. परिसरात दोन धामण सर्प आणि एक विषारी कोब्रा सर्प रेस्क्यू करण्यात आले. त्यांना सुरक्षित अधिवासात मुक्त करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com