पुराने गावाचा संपर्क तुटला; अन्‌ इकडे आरूषीचा आयुष्‍याशी कायमचा!

पुराने गावाचा संपर्क तुटला; अन्‌ इकडे आरूषीचा आयुष्‍याशी
पुराने गावाचा संपर्क तुटला; अन्‌ इकडे आरूषीचा आयुष्‍याशी कायमचा!

जळगाव : मुसळधार पावसामुळे बोरी नदीला अनेक दिवसानंतर पूर आला. या पुरामुळे सात्री गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला. मात्र गावातील यंत्रणा नसल्‍याने तापाने फणफणत असलेल्या तेरा वर्षीय मुलीला प्रयत्‍न करूनही दवाखान्यात नेता आले नाही. त्यामुळे नदीच्या काठावरच तिचा मृत्यू झाला. अर्थात पुराने गावाचा संपर्क तुटला अन्‌ तिचा आयुष्‍याशी. (jalgaon-news-amalner-taluka-satri-village-no-contact-in-bori-river-full-water-girl-death)

अमळनेर तालुक्यातील सात्री येथील आरुषी सुरेश भिल (वय १३) ही दोन दिवसांपासून आजारी होती. यातच बोरी नदीला पूर आल्याने नदी ओलांडून तिला घेऊन जाणे शक्‍य नव्‍हते. बोरी नदीला जास्त पाणी असल्याने मुलीला दवाखान्यात नेता आले नाही. तर, डॉक्टरांना देखील गावात येणे शक्य झाले नाही.

टायरचा बलुन करत नदी ओलांडण्याचा प्रयत्‍न पण

मंगळवारी सकाळी ताप वाढल्याने तिला अत्यवस्थ वाटू लागले. म्हणून तिला शेजारच्या गावातील दवाखान्यात हलवण्याची तयारी झाली. परंतु नदीला पूर असल्याने पलीकडच्या गावात जाणे शक्य नव्हते. इकडे आरुषीची तब्येत आणखीनच बिघडली. मग काही ग्रामस्थांनी एका खाटेला हवा भरलेले ट्यूब बांधून नाव तयार केली. त्यावर आरुषी व तिच्या आईला बसवून नदी पार केली. परंतु, तोवर उशीर झाला होता. दवाखान्यात पोहचेपर्यंत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

लेकीला वाचविण्याची पराकाष्‍ठा

लेक वाचावी म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून, चार- पाच जणांच्या साहायाने टायरच्या ट्यूब व खाटेचा आधाराने नदी पार करण्याचा प्रयत्‍न आईने केला. मात्र दुर्दैवाने आईच्‍या मांडीवर लेकीचा जीव गेला व आई केवळ बघत राहण्याशिवाय काही करू शकली नाही.

पुराने गावाचा संपर्क तुटला; अन्‌ इकडे आरूषीचा आयुष्‍याशी कायमचा!
जामनेर तालुक्‍यात अतिवृष्‍टी; अनेक गावांमध्‍ये शिरले पाणी

गावाचे पुनर्वसन कधी

सात्री हे गाव तापी नदीवरील निम्न तापी प्रकल्पामुळे पुनर्वसित आहे. मात्र, गेल्या ८ वर्षांपासून या गावच्या पुनर्वसनासह सोयीसुविधांचा प्रश्न प्रलंबित आहे. शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करूनही सात्रीकरांच्या अडचणी सुटलेल्या नाहीत. दरवर्षी पावसाळ्यात बोरी नदीला पूर आला की सात्रीचा इतर गावांशी संपर्क तुटतो. अशा वेळी आणीबाणीच्या परिस्थितीत पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागते. नदी ओलांडण्यासाठी दुसरा कोणताही रस्ता नसल्याने याठिकाणी पूल उभारण्याची मागणी आहे. पण ती दुर्लक्षितच आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com