Jalgaon: जिल्‍हा परिषदेवर प्रशासकराज; सीईओंकडे जबाबदारी

जिल्‍हा परिषदेवर प्रशासकराज; सीईओंकडे जबाबदारी
Jalgaon ZP
Jalgaon ZPSaam tv
Published On

जळगाव : जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांची पंचवार्षिक मुदत २० मार्चला संपली. यानंतर आजपासून जिल्हा परिषदेवर प्रशासक राज येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची शासनाकडून प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आल्‍याने प्रशासक म्‍हणून कारभार पाहत आहेत. (jalgaon news Administrator jalgaon Zilla Parishad Responsibility to CEOs pankaj ashiya)

Jalgaon ZP
वीज ग्राहकांकडे ११२ कोटी थकीत; धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील स्थिती

जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांपाठोपाठ जिल्‍हा परिषद (Zilha Parishad) पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ 20 मार्चला संपला. जिल्‍हा परिषदेच्‍या निवडणुका अद्याप जाहीर न झाल्याने आता जिल्हा परिषदेवर पदाधिकाऱ्यांची सत्ता, अधिकार संपले आहेत. यामुळे आजपासून प्रशासक लागू झाले असून जि.प. सीईओ डॉ. पंकज आशिया (Pankaj Aashiya) यांनी सूत्रे सांभाळली आहेत. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका होईपर्यंत अर्थात किमान सहा महिनेतरी सीईओ जिल्‍हा परिषदेवर प्रशासक म्‍हणून असतील.

यंदाचा बजेट प्रशासकांकडून सादर

जिल्‍हा परिषदेचा (Jalgaon ZP) बजेट सादर होण्यापुर्वी पदाधिकारींचा कार्यकाळ संपला आहे. यामुळे आता यंदाचा जिल्हा परिषदेच्या बजेटचे नियोजन जि.प. प्रशासनाकडून केले जाईल. या दृष्‍टीने प्रशासनाची तयारी सुरु आहे. मात्र अर्थ समितीचे अध्यक्ष असलेले लालचंद पाटील यांचा कार्यकाळ संपल्याने यंदा आता प्रशासक बजेट सादर करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com