Jalgaon Accident : दुचाकी विद्युत पोलवर धडकून अपघात; इसमाचा जागीच मृत्यू

Jalgaon News : नागरिकांनी त्यांना जिल्‍हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी तपासून मृत घोषित केले.
Jalgaon Accident
Jalgaon AccidentSaam tv

जळगाव : कंपनीला सुटी असल्याने घरात आवश्यक असलेला किराणा करण्यासाठी जळगावी आले होते. (Jalgaon) किराणा करून घरी जात असताना दुचाकी विद्युत पोलवर धडकून झालेल्या अपघातात इसमाचा जागीच (Death) मृत्यू झाला. हा अपघात शिरसोली (ता.जळगाव) येथे घडला. (Maharashtra News)

Jalgaon Accident
Crop Insurance : अमरावती जिल्ह्यासाठी पीकविमा मंजूर; तरीही ७९ हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा

कबीर भिवा चव्हाण (वय ४४, रा. शिरसोली ता. जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत कबिर हे एका खाजगी कंपनीत कार्यरत होते. तर शिरसोली गावात आई, पत्नी, २ मुले, भाऊ यांच्यासह रहायचे. दरम्यान १० फेब्रुवारीला सुटी असल्याने ते जळगावहून किराणा घेऊन घरी शिरसोलीला जात असतांना नेहरुनगर परिसरात (Accident) आले असता त्यांची दुचाकी वीजेच्या खांबावर आदळली. यानंतर नागरिकांनी त्यांना जिल्‍हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी तपासून मृत घोषित केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalgaon Accident
Nanded Water Shortage : नांदेड शहरात होणार पाणीकपात; विष्णूपुरी धरणात २५ टक्केच पाणीसाठा

कुटूंबीयांचा आक्रोश
चव्हाण यांचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांना कळताच त्यांनी एकच आक्रोश केला. किराणा घेण्यासाठी जळगावी आले अन्‌ परतताना झालेल्या अपघातात मृत्युमूखी पडल्याने कुटूंबाचा आधार हिरावुन गेला आहे. एमआयडीसी (Police) पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com