Accident
AccidentSaam tv

महिनाभरापुर्वी लग्‍न; पत्नीला भेटायला गेला पण तिची भेट ठरली अखेरची

महिनाभरापुर्वी लग्‍न; पत्नीला भेटायला गेला पण तिची भेट ठरली अखेरची
Published on

जळगाव : महिनाभरापुर्वी लग्‍न होवून संसाराला सुरवात झाली. लग्‍नानंतर माहेरी गेलेल्‍या पत्‍नीला भेटण्यासाठी गेला. परंतु, पत्‍नीची झालेली ही भेट अखेरची ठरली. भेट घेवून बऱ्हाणपूर येथून मोटारसायलने येत असताना अपघात (Accident) होवून त्‍याचा मृत्‍यू झाला. (jalgaon accident news Get married a month ago husband death accident wife her visit was the last)

Accident
मॅडम तुम्‍ही जाऊ नका..बदलीने विद्यार्थीना झाले अश्रू अनावर

बऱ्हाणपुर येथून जळगावकडे (Jalgoan) दुचाकीने येत असतांना अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. काही अंतरावर जळगाव आले असताना अपघातात दुचाकीवरील दोघ तरुणांचा जागीच मृत्यू (Accident Death) झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. परवेर निसार खाटीक (वय २२, रा. लक्ष्मीनगर) व आमिर जाकीर खाटीक (वय २३, रा. उस्मानिया पार्क) या दोघे मामे व आतेभाऊचा मृत्‍यू झाला.

त्‍याचा जागीच मृत्‍यू

शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील परवेज खाटीक व उस्मानिया पार्क येथील आमिर खाटीक हे आतेभाऊ– मामेभाऊ आहेत. परवेजचे गेल्या महिन्यात लग्न (Marriage) झाले असून तो शनिवारी आमिरसोबत बऱ्हा‍णपुर येथे पत्नीला भेटण्यासाठी गेला होता. सायंकाळी बऱ्हाणपूर येथून जळगावला येत असतांना त्याच्या (एमएच १९, सीएच ६०५९) क्रमांकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात परवेज याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात आमिरच्या पोटातील आतडे बाहेर येवून तो गंभीर जखमी झाला होता. नागरिकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल केले. परंतु, डॉक्‍टरांनी त्‍यांना मृत घोषित केले.

कुटूंबियांचा आक्रोश

अपघाताची माहिती मिळताच दोघांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. एकाचवेळी आते व मामेभाऊंचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांचा रुग्णालयातील मनहेलावणारा आक्रोश होता. परवेज हा अद्रक व लसूण विक्रीचे काम करुन उदरनिर्वाह भागवायचा. तर आमिरचे गॅरेज होते गॅरेजवर काम करून तो उदरनिर्वाह भागवत होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com