Jalgaon: १०८ अंगणवाड्यांना मिळणार स्वमालकीचे छत!

१०८ अंगणवाड्यांना मिळणार स्वमालकीचे छत!
Jalgaon Zp
Jalgaon Zpsaam tv
Published On

जळगाव : जळगाव जिल्‍ह्यातील बहुतांश अंगणवाडींना हक्‍काच्‍या इमारती नसल्‍याने या अंगणवाडी भाड्याच्‍या खोलीत किंवा मोकळ्या जागेवर भरविल्‍या जात होत्‍या. परंतु, आता जिल्‍ह्यातील १०८ अंगणवाडींना स्‍वमालकीच्‍या इमारती मिळणार आहेत. (Jalgaon News) याकरीता दहा कोटी रूपयांचा निधी डीपीडीसीमधून मंजूर केला आहे. (jalgaon news 108 Anganwadis will get their own buildingin district)

Jalgaon Zp
‘प्रपोज डे’ला केला प्रपोज; नकार मिळाल्‍याने तरुणीसमोरच कापली नस

पिढी घडवण्यात अंगणवाडी योगदान देते. बालकांचा शारीरिक आणि मानसिक विकासाचा पाया मजबूत करण्याचे काम अंगणवाड्या करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यावर्षी १०८ अंगणवाडी इमारत बांधकामसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कॅबिनेट मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दहा कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल १०८ अंगांवड्यांच्‍या इमारतींचा प्रश्‍न सुटला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया (Ceo Pankaj Aashiya) यांनी प्राधान्य क्रमानुसार अंगणवाडी बांधकाम प्रशासकीय मान्यता दिल्या आहे. जळगांव (Jalgaon) जिल्ह्यातील अंगणवाडी ही गावातील महिला आणि बाल विकासाचे केंद्र व्हावे या दृष्टीने कामकाज व्हावे व संबंधित संबंधित अभियंत्यांनी मुदतीत आणि दर्जेदार कामे करण्याच्या सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत.

३७६ अंगणवाड्यांना अजूनही नाही इमारत

जिल्ह्यात ग्रामीण भागात ३ हजार ४३८ तर जिल्हा परिषद (Jalgaon ZP) अंतर्गत शहरी भागात २०३ असे एकूण ३ हजार ६४१ अंगणवाडी केंद्र सुरू आहेत. जिल्ह्यात अजूनही ३७६ अंगणवाड्याना स्वतःच्या इमारती नाही. त्यामुळे उर्वरित अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी आगामी तीन वर्षात टप्याटप्याने शंभर टक्‍के निधी मंजूर करून अंगणवाड्यांसाठी स्वतःच्या इमारती असलेला जळगाव जिल्हा असेल अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

इमारत मिळालेल्‍या तालुकानिहाय अंगणवाड्या

ज्या अंगणवाडी केंद्र उघड्यावर, भाड्याच्या खोलीत, एकत्र किंवा ग्रामपंचायत इमारतीत भरत होत्या; अशा १०८ अंगणवाड्याना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्‍या. त्यात अमळनेर- 4, भडगाव- 4, भुसावळ- 2, बोदवड- 3, चाळीसगाव- 11, चोपडा- 8, धरणगाव- 6, एरंडोल- 5, जळगाव- 8, जामनेर- 12, मुक्ताईनगर- 5, पाचोरा- 8, पारोळा- 6, रावेर- 8, यावल- 18 अशा 108 अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com