Bacchu Kadu : गुलाबराव पाटलांचं गुलाबाऐवजी कमळावर जास्त प्रेम; बच्चू कडूंचा मिश्किल हल्लाबोल

Maharashtra Politics : महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात. बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती, सरकारी खरेदीच्या मागण्यांसाठी सरकारला इशारा दिला आहे. गुलाबराव पाटलांवर आणि बावनकुळे यांच्यावरही टीका.
Bacchu Kadu : गुलाबराव पाटलांच गुलाबाऐवजी कमळावर जास्त प्रेम; बच्चू कडूंचा मिश्किल हल्लाबोल
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On
Summary
  • अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, कर्जमाफीची मागणी

  • बच्चू कडूंचा गुलाबराव पाटील आणि बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल

  • २८ तारखेला पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चाचा इशारा

  • मागणी पूर्ण होईपर्यंत कायम आंदोलन सुरू ठेवणार – बच्चू कडू

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच शेतकऱ्यांचे पूर्णपणे कर्ज माफ व्हावे, दिव्यांग आणि इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आवाज उठवला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव येथे आंदोलन करण्यात आलं. यानंतर गुलाबराव पाटील यांनी बच्चू कडू यांना जळगाव मध्ये येऊनच दाखवा असे म्हटले आहे. या वक्तव्यावर बच्चू कडू यांनी गुलाबराव पाटील यांना "गुलाबराव पाटील हे आता गुलाबापेक्षा कमळावर जास्त प्रेम करत आहे" असं मिश्किल उत्तर दिलं आहे.

बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आल्यानंतर प्रशासनाने शेतीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले असले, तरी मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या २८ तारखेला दुसरा मोर्चा पालकमंत्र्यांच्या घरावर काढण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर माझ्या गावात येऊन तर दाखवा, असे थेट आव्हान आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बच्चू कडू यांना दिले. त्यानंतर बच्चू कडू मंत्री गुलाबराव पाटील यांना प्रतिउत्तर देताना म्हणाले, " गुलाबराव पाटील हे आता गुलाबापेक्षा कमळावर जास्त प्रेम करत आहे, कमळाचे प्रेम हे शेतकऱ्यांपेक्षा जास्त होत आहे, हे तुम्हाला वांदयात आणेल. मंत्री कधीपासून एका गावाचे झाले? ते पूर्ण महाराष्ट्राचे आहे,तुम्ही मंत्री असून जर गावात या असं म्हणत असाल तर मी पाच तारखेला जळगाव ला येत आहे. मला व्यक्तिगत वादापेक्षा शेतकरीवाद महत्त्वाचा वाटते, पण तुमची इच्छा असेल तर मी शेतकरी पुत्र म्हणून येतो, तुम्ही सत्तेतले व पक्षाचे पुत्र म्हणून या,पाहू कोण जिंकत?"

Bacchu Kadu : गुलाबराव पाटलांच गुलाबाऐवजी कमळावर जास्त प्रेम; बच्चू कडूंचा मिश्किल हल्लाबोल
KDMC News : २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका करा, अन्यथा रस्त्यावर उतरू, शेकडो नागरिक आक्रमक

त्यानंतर बच्चू कडू यांनी मंत्री बावनकुळे यांच्यावर निशाणा साधत म्हणाले, " अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे हे बांधावर दिसले का?एवढा पाऊस होऊनही ते शेतकऱ्यांच्या बांधावर दिसले नाही. बावनकुळे यांना दहीहंडी फोडायला,गणपती दर्शनासाठी यासाठी जायला वेळ आहे,पण मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नाही." असे त्यांनी म्हटले.

Bacchu Kadu : गुलाबराव पाटलांच गुलाबाऐवजी कमळावर जास्त प्रेम; बच्चू कडूंचा मिश्किल हल्लाबोल
Mumbai Railway : रेल्वेचा मोठा निर्णय! पालघर जिल्ह्यात ७ नवीन रेल्वे स्टेशन उभारणार, गेमचेंजर प्रकल्प कधी पूर्ण होणार?

दरम्यान राज्यात अतिवृष्टी जाहीर करा व तात्काळ कर्जमुक्तीची घोषणा करा. तसेच सोयाबीन,कापूस,मका,तूर,ज्वारीची शासकीय खरेदी सुरू केली नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये कुटार भरल्याशिवाय राहणार नाही बच्चू कडूंचा थेट सरकारला इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लवकरच एक मोठं कायम च आंदोलन करू, त्या ठिकाणी जोपर्यंत घोषणा नाही तोपर्यंत परत जाणार नाही. काही झालं तरी बेहत्तर पण आंदोलन मागणी पूर्ण झाल्याशिवाय थांबणार नाही. असे बच्चू कडू यांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com