गिरणा धरण यंदा रिकामेच; पाणीसाठ्यात अवघ्या पाच टक्क्यांनी वाढ

सध्यस्थितीत दमदार पावसाची अत्यंत गरज आहे. पिकांची स्थिती चांगली असली तरी गेल्या तीन- चार दिवसापासून वाऱ्याची दिशा बदलल्याने आणि वाऱ्याचा वेग वाढल्याने जमिनीची ओल कमी होत चालली आहे. अशा स्थितीत दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
Girna dam
Girna dam

मेहुणबारे (ता. चाळीसगाव ) : गेल्या वर्षापेक्षा यावर्षी पाहिजे तसा पाऊस झाला नसल्याने गिरणा धरण अवघे 5 टक्के, तर मन्याड धरणात 10 टक्यांनी वाढ झाली आहे. चाळीसगाव तालुक्यातील असलेल्या १४ लघु प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने ठणठणीत आहेत. बहुतांश प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर गळती आहे. त्यांची पाणी गळती रोखण्यासाठी उपाय योजना करण्याची गरज आहे. (jalgaon-marathi-news-Girna-Dam-water-level-increases-3-percent-last-two-month)

चाळीसगाव तालुक्यात यंदा मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. मान्सून सुरू होताच पाऊस देखील गायब झाला. मान्सूनपूर्व पावसाच्या भरोश्यावर अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. त्यानंतर पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली होती. तालुक्यात दुबार पेरणीचे संकट ओढावतेय की काय अशी स्थिती असतांना तब्बल 15 ते 20 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे आगमन झाले. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले. त्यानंतर अधून मधून कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने खोळंबलेल्या पेरण्या आटेापल्या. सध्यस्थितीत दमदार पावसाची अत्यंत गरज आहे. पिकांची स्थिती चांगली असली तरी गेल्या तीन- चार दिवसापासून वाऱ्याची दिशा बदलल्याने आणि वाऱ्याचा वेग वाढल्याने जमिनीची ओल कमी होत चालली आहे. अशा स्थितीत दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

धरणांची स्थिती चिंताजनक

पावसाचे महत्वाचे दोन महिने उलटले तरी सद्यस्थितीत गिरणा धरणात केवळ 38 टक्के पाणीसाठा आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या धरणात 33 टक्के साठा होता. दोन महिन्यात केवळ 5 टक्यांनी वाढ झाली. गेल्या दोन वर्षापासून गिरणा धरण 100 टक्के भरत आहे. गिरणेच्या उगम स्थानावरील हरणाबरी, केळझर, चणकापूर हे धरणे भरल्याशिवाय गिरणेच्या पाणी पातळीत वाढ होत नाही. त्यामुळे उर्वरीत पावसाळ्यात तरी वरील धरणे ओव्हरफ्लो झाल्यास गिरणेचे पाणी साठ्यात वाढ होवू शकते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गिरणा 100 टक्के भरले होते. गिरणेवर जळगाव जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे तर त हजारो हेक्टर शेतीला गिरणेचा फायदा होतो.

चाळीसगाव तालुक्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प असलेल्या मन्याड धरणातही जेमतेम 27 टक्केच पाणीसाठा आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मन्याडमध्ये अवघा 17 टक्के पाणीसाठा होता; तो आजअखेर 27 टक्यावर पोहचला आहे. म्हणजे पावसाच्या दोन महिन्यात मन्याडमध्ये केवळ 10 टक्यांनी वाढ झाली आहे. मन्याड धरणही गेल्या वर्षी परतीच्या दमदार पावसामुळे 100 टक्के भरले होते.

Girna dam
आदर्श विवाह..तीन मुलांसह विधवा वहिनीला स्‍वीकारले

14 प्रकल्पांमध्येही ठणठणाट

चाळीसगाव तालुक्यातील 14 लघु प्रकल्प सध्या कोरडेठाक आहेत. दोन महिने उलटूनही पावसाचा जोर कमी असल्याने त्याचा परिणाम या प्रकल्पांवर झाला आहे. तर काही प्रकल्पांना गळती आहे. हातगाव-1, खडकीसीम, पिंप्री उंबरहोळ, वाघला-1, ब्राम्हणशेवगे, पिंपरखेड, कुंझर-2, वाघला-2, वलठाण, राजदेहरे, पथराड व कृष्णापुरी हे लघु प्रकल्प गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ओव्हरफ्लो झाली होती. तर बोरखेडा व देवळी भोरस या प्रकल्पांमध्ये समाधानकारक साठा होता. यंदा जुलै संपत आला तरी या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शून्य असल्याने या प्रकल्पांवर अवलंबून असुन शेतकऱ्यांमध्ये चिंतेची भर पडली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com