Smita Wagh News : केलेल्या विकासाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला; विजयानंतर स्मिता वाघ यांची प्रतिक्रिया

Jalgaon News ; जळगाव मतदार संघातून भाजपच्या स्मिता वाघ यांनी शिवसेना ठाकरे गटाचे करणं पवार यांचा पराभव करत प्रथमच खासदार म्हणून विजयी झाल्या
Smita Wagh
Smita WaghSaam tv

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट जाहीर झाल्यापासून हि निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्ष केलेला विकास आम्ही जनतेपर्यंत घेऊन गेलो होतो. यामुळे नक्कीच हा विकासाचा विजय असल्याचे मत जळगाव लोकसभा मतदार संघातून विजयी झालेल्या स्मिता वाघ यांनी बोलताना दिली आहे. 

Smita Wagh
Raver Lok Sabha : रक्षा खडसेंची रावेरमधून विजयाची हॅट्रिक

लोकसभा निवकणुकीसाठी झालेल्या मतदानाचा आज निकाल जाहीर झाला. यात जळगाव (Jalgaon) मतदार संघातून भाजपच्या स्मिता वाघ यांनी शिवसेना ठाकरे गटाचे करणं पवार यांचा पराभव करत प्रथमच खासदार म्हणून विजयी झाल्या आहेत. या विजयानंतर स्मिता वाघ यांनी माध्यमांशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे. 

Smita Wagh
Yavatmal News : यवतमाळमध्ये महाविकास आघाडी समर्थकांकडून जल्लोष करत घोषणाबाजी; संजय देशमुख यांना आघाडी

सिंचन व नवीन उद्योग आणण्यासाठी प्राधान्य 

स्मिता वाघ यांनी सांगितले कि विरोधकांनी (BJP) त्यांच्या पद्धतीने काम केले, आम्ही आमच्या पद्धतीने काम केले. कामावर श्रद्धा ठेवली. सर्व नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली असून मतदारांनी जो विश्वास दाखविला त्याबद्दल आभार. तसेच आता जळगाव जिल्ह्यातील सिंचनाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा माझा मानस राहील. कारण शेतकरी राजा खुश झाला तर जनता खुश होईल. तसेच नवीन उद्योग आणण्यासाठी आगामी काळात काम करणार असल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com