Chitra Wagh Statement: आरोपीला शिक्षा हीच सरकारची भूमिका; चित्रा वाघ यांनी घेतली पीडितेच्या कुटुंबीयांची भेट

Jalgaon News आरोपीला शिक्षा हीच सरकारची भूमिका; चित्रा वाघ यांनी घेतली पीडितेच्या कुटुंबीयांची भेट
Chitra Wagh
Chitra WaghSaam tv
Published On

जळगाव : अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याचा घटना या दुर्देवी आहे. यातील आरोपीला शिक्षा हि व्हायलाच हवी, हीच (Jalgaon) सरकारची भूमिका आहे. राज्यात महायुतीचं सरकार असून महिला आणि मुलींची सुरक्षा हा महायुती सरकारचा टॉप प्रायोरिटीचा विषय (Chitra Wagh) असल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली. (Breaking Marathi News)

Chitra Wagh
Sangli News : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पोलिसांनी छापा टाकत पाच महिलांची केली सुटका

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात असलेल्या गोंडगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर (BJP)  भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गोंडगावला भेट देऊन पीडितेच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. याप्रसंगी त्या बोलत होत्या. 

Chitra Wagh
Beed News: खड्ड्याभोवती रांगोळी काढून I LOVE YOU लिहीत केलं प्रपोज; मनसे कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन

मुली भयमुक्त वातावरणात वावरतील 

राज्यात कुठेही महिला अत्याचाराची घटना घडली तर आरोपींना पाठीशी घातलं जाणार नाही. कुणीही आरोपी असला तरी त्याला शिक्षा व्हावी, ही सरकारची भूमिका आहे, असंही त्या म्हणाल्या. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः अशा प्रकरणांमध्ये जातीने लक्ष घालून असतात. त्यामुळे आगामी काळात राज्यातील मुली भयमुक्त वातावरणात वावरतील; असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com