Bee Attack : पूजेसाठी होम पेटविताच घडला अनर्थ; मधमाश्यांच्या हल्ल्यात पुजाऱ्याचा मृत्यू

Jalgaon News : पूजेसाठी होम पेटवला असता त्यामुळे धूर झाल्याने पुलाखाली असलेल्या मधमाश्‍यांच्या पोळ्यापर्यंत धूर पोहोचला. यानंतर मधमाश्‍या उठल्याने त्यांनी पूजेला बसलेल्यांवर हल्ला चढविला
Bee Attack
Bee AttackSaam tv
Published On

अमळनेर (जळगाव) : दशक्रिया विधी आटोपल्यानंतर अकराव्याची पूजा करण्यासाठी नदीवर मंडळी जमली होती. दुपारी पूजा सुरु असताना मधमाश्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात अकराव्याची पूजा करणाऱ्या पुजाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील जळोद या गावालगतच्या नदीकाठावर घडली आहे.

अमळनेर तालुक्यातील जळोद येथे डॉ. काकासाहेब देशमुख यांच्या अकराव्याची पूजा होती. सदरची पूजा करण्यासाठी घरातील मंडळींसह पुजारी गेले होते. सदरची पूजा हि नदीकाठावरच करावी म्हणून अमळनेर येथील पुजारी अमोल शुक्ल (वय ३८) यांनी सांगितले होते. त्यानुसार जळोद येथे नदीकाठावर पुलाखाली देशमुख यांच्या मुली व मुलांसोबत पूजा सुरू होती. 

Bee Attack
Sangli DCC Bank : पाच सूतगिरण्यांची मालमत्ता विक्रीसाठी मागविल्या निविदा; थकित कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेची कारवाई

धूर होताच मधमाशा उठल्या 

पूजेसाठी होम पेटवला असता त्यामुळे धूर झाल्याने पुलाखाली असलेल्या मधमाश्‍यांच्या पोळ्यापर्यंत धूर पोहोचला. यानंतर मधमाश्‍या उठल्याने त्यांनी पूजेला बसलेल्यांवर हल्ला चढविला. मधमाश्यांचा हल्ला झाल्याने पूजेसाठी जमलेले सर्व जण सैरावैरा पळू लागले. मात्र पुजारी अमोल शुक्ल यांनी पळू नका. खाली झोपून घ्या; त्या चावणार नाहीत असे सर्वाना सांगत ते खाली वाकले. 

Bee Attack
Pandharpur Maghi Yatra : माघी यात्रेनिमित्त रात्री बारापर्यंत दर्शन व्यवस्था; भाविकांसाठी पाच लाख लाडू प्रसाद तयार

उपचारासाठी आणताना मृत्यू 

पुजारी अमोल हे खाली वाकून राहिल्याने मधमाश्‍या त्यांच्या तोंडाला चावल्या. यात ते जखमी झाले होते. त्यांना अधिक त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी त्यांना अमळनेर येथे आणले जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर इतर पाच ते सहा जणांनाही मधमाश्‍या चावल्याने त्यांचे अंग सुजले होते. त्यांच्यावर अमळगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com