Jalgaon Accident : बारावीचा पेपर देण्यापूर्वी घडले दुर्दैवी; सुसाट गाडीची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

Jalgaon News : दोघेही मित्र दुचाकीने जळगाव शहरात येत असताना एमआयडीसी परिसरातील आर. एल. चौकाच्या पुढे मालवाहू वाहन भरधाव वेगात मुख्य रस्त्यावर आल्याने उमाळ्याकडून येणाऱ्या दोघांची दुचाकीसोबत धडक झाली
Jalgaon Accident
Jalgaon AccidentSaam tv
Published On

जळगाव : उमाळ्याकडून जळगाव शहरात येत असलेल्या तरुणांच्या दुचाकीवर भरधाव वेगाने आलेले मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. बारावीच्या परीक्षेसाठी शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात बैठक व्यवस्था पाहण्यासाठी दोघे मित्र जळगावात येत असताना हा अपघात घडला. 

जळगाव- संभाजीनगर महामार्गावर झालेल्या अपघातात उमाळा येथील मोहित संजय मोरे (वय २०) याचा मृत्यू झाला आहे. तर गौरव अशोक पाटील (वय १८) हा गंभीर जखमी झाला आहे. मोहित मोरे हा तरुण जामनेर येथील फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तर गावातीलच गौरव पाटील याची बारावीची परीक्षा सुरू होत आहे. नूतन मराठा महाविद्यालयात त्याचा पेपर होता. बैठक व्यवस्था पाहण्यासाठी गौरवने मोहीतला सेाबत घेतले. 

Jalgaon Accident
Ambabai Temple : कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी दोन कोटींचे दान; जगदंबा देवी मंदिरात दोन किलोचा सोन्याचा मुकुट

बैठक व्यवस्था पाहण्यासाठी येताना अपघात 

दोघेही मित्र दुचाकीने जळगाव शहरात येत असताना एमआयडीसी परिसरातील आर. एल. चौकाच्या पुढे मालवाहू वाहन भरधाव वेगात मुख्य रस्त्यावर आल्याने उमाळ्याकडून येणाऱ्या दोघांची दुचाकीसोबत धडक झाली. या अपघातात दोघे तरुण गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिक आणि इतर वाहनधारकांनी जखमींना उचलून रुग्णालयात हलविले. मात्र उपचार सुरू असताना मोहीत याचा मृत्यू झाला. तर जखमी गौरव पाटील याच्यावर उपचार सुरू आहेत. 

Jalgaon Accident
HSC Exam : ड्रोन कॅमेराची नजर नावालाच; बारावी परीक्षेत एकाही केंद्रावर झाले नाही ड्रोनद्वारे चित्रीकरण

एकुलता एक मुलगा गमावला 

सदर अपघाताची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दुचाकीला धडक देणारे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणी सुरवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर जखमी मोहीत मोरे याचा मृत्यू झाल्याची घटना उमाळा गावात कळतात ग्रामस्थांनी जिल्‍हा रुग्णालयात धाव घेतली. तर मोहीत त्याच्या आई-वडिलांचा एकुलता मुलगा असल्याने कुटुंबीयांनी एकच आक्रोश करीत हंबरडा फोडला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com