Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar SAAM TV

'जय जय महाराष्ट्र माझा...' गीताला लवकरच राज्यगीताचा दर्जा मिळणार, सुधीर मुनगंटीवारांची माहिती

सध्या देशातील 11 राज्यांत स्वतःचे राज्य गीत वाजवले जाते.
Published on

मुंबई : 'जय जय महाराष्ट्र माझा...' हे गीत लवकरच राज्यगीत म्हणून घोषित होऊ शकते. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे या गीताची निवड राज्यगीत म्हणून केली जाऊ शकते. सध्या देशातील 11 राज्यांत स्वतःचे राज्य गीत वाजवले जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात शासकीय कार्यक्रमांच्या सुरुवातीला हे गीत वाजवले जाऊ शकते, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे.

Sudhir Mungantiwar
रायगडावरील श्वानाचं स्मारक हटवण्याची का होतेय मागणी? वादाचं नेमंक कारण काय? इतिहास संशोधक म्हणतात...

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही घोषणा होण्याची शक्यता आहे. सांस्कृतिक विभागाने 'जय जय महाराष्ट्र...' या गीतासह "बहु असोत सुंदर संपन्न की महा" आणि "मंगल देशा, पवित्र देशा" या दोन गीतांवर विचार केला होता. अखेर शाहीर साबळे यांनी गायलेले जय जय महाराष्ट्र.. या गीताची निवड करण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

दीड मिनिटांत बसेल गीताच्या तीन कडव्यांना कात्री लावण्याची शक्यता आहे. मात्र गीतातील मूळ शब्द बदलले जाणार नाहीत. कार्यक्रमांच्या सुरुवातीला हे गाणे गायले जाईल आणि राष्ट्रगीताने संबंधित कार्यक्रमाची सांगता होईल.

Sudhir Mungantiwar
मुंबई असुरक्षित बनतेय? २०१२ ते २०२१ दरम्यान बलात्काराच्या घटनांमध्ये २३५% वाढ, प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून अनेक प्रश्न उपस्थित

गीत कवी रादा बधे यांनी लिहिली आहे. तर श्रीनिवास खळे यांनी संगीत दिले आहे. शाहीर साबळे यांच्या पहाडी आवाजाने हे गीत सजलं आहे. शाहीर साबळे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष राज्यात साजरे केले जात आहे. त्या निमित्ताने हे गीत रिलीज होणार आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले त्यावेळी मुंबईमधील दादर येथील शिवाजी पार्क येथे झालेल्या समारंभात शाहीर साबळे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर हे गाणे गायले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com