नागपूर : कर्नाटकमध्ये (Karnatak) काही मंदिरांच्या आसपासच्या परिसरात अज्ञातांनी भित्तीपत्रके चिकटवली आहेत. या भित्तीपत्रकरांवर मंदिरांच्या जत्रेत मुस्लिमांच्या दुकानांना आणि स्टॉलना बंदी असे छापले आहे यावरती बोलताना शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत यांनी हे चुकीचं असल्याचं म्हंटलं आहे. ते नागपूरात बोलत होते.
श्रीधर पाटणकर यांची एक संपती जप्त केल्याची माहितीत मिळत आहे ना, पुर्ण माहिती मिळाली की बोलू तेलाच्या किंमती वाढत आहेत. काल संसदेत महागाईवर चर्चा झाली आणि सभागृह चालू दिलं नाही. आता निवडणूका संपल्या, हेच भाजपचं धोरण आहे. चाल आहे. लोक यात फसतात देशात पुन्हा एकदा महागाईवर एक महौल बनणार, खरी समस्या रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) हिजाब, काश्मिर फाईल नाही, देशाची खरी समस्या बेरोजगारी आणि महागाई असल्याचं वक्तव्य देखील राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी केलं.
विदर्भात प्रतिनिधीत्व देण्याबाबत मुख्यमंत्री गांभीर्याने विचार करत आहे. विदर्भाला लवकरंच प्रतिनिधीत्त्व मिळेल. केंद्रीय यंत्रणा (Central system) जशा सुडाच्या भावनेनं कारवाई करत आहेत. त्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार कधीही करणार नाही. महाराष्ट्राला चांगल्या नेत्यांची प्रतिष्ठा, परंपरा आहे. विरोधीपक्ष नेते कितीही सुडाच्या कारवाया सुरु आहेत म्हटलं तरी आम्हाला सुडाच्या करायच्या असले तर आम्हाला केंद्रीय तपास यंत्रणांकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल. आम्हाला त्याची आवश्यकता नाही असही राऊत म्हणाले.
पहा व्हिडीओ -
नील सोमय्यांबाबत (Neil Somaiya) सरकारकडे काही पुरावे देण्याचं काम केलं आहे आता त्यापुढचं काम तपास यंत्रणांना करायचं आहे. पुराव्यांमध्ये काही सापडलं तर पोलीस कारवाई करतील, राज्य सरकारचा या प्रकरणात काही दबाव नाही. तपास यंत्रणा स्वतंत्र आहे. मला भिती वाटते की आमच्या एखाद्या शिवसैनिकांची वडापावची गाडी असेल त्याच्यावर सुद्धा ईडी कारवाई करेल कर्नाटकात काही मंदिराबाहेर मुस्लीमांना दुकान लावण्याची मनाई हे चुकीचं आहे. राजकीय स्वार्थासाठी असं वातावरण निर्माण केलं तर देशात स्वातंत्र्यापुर्वीची परिस्थिती निर्माण होईल असही राऊत म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.