रामनाथ ढाकणे| छत्रपती संभाजीनगर, ता. १३ जुलै २०२४
छत्रपती संभाजीनगरमध्ये इसिसचे जाळे पसरले असून सोशल मीडियाद्वारे तब्बल ५० तरुण एसिसच्या संपर्कात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. फेब्रुवारीमध्ये अटक केलेल्या झोएब खान मोहम्मदच्या विरोधात एनआयएने दोषारोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रातून हा खळबळजनक खुलासा झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली दहशतवाद पसरविणाऱ्या इसिस संघटनेचे जाळे आता छत्रपती संभाजीनगर शहरात सुद्धा पसरले असल्याचे स्पष्ट झाले असून किमान 50 तरुण इसीस च्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. 15 फेब्रुवारीला एनआयएने छत्रपती संभाजीनगर शहरात छापेमारी केली होती आणि हरसुल परिसरातून झोएब मोहम्मद खान याला अटक केले होते.
त्यानंतर त्याच्या विरुद्ध मुंबईतील एन.आय.ए.च्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. यामध्ये संभाजीनगरातून सुरू असलेल्या इसिसच्या कारवायांची ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतात मोठ्या घातपाती कारवाया करून अफगाणिस्तान किंवा तुर्कीय पळून जाण्याचा कट त्याने रचला होता.
शिवाय लिबियाचा शोएब आणि छत्रपती संभाजी नगरातील झोएब या कटाचे सूत्रधार होते असे एन.आय.ए ने दाखल केलेल्या दोषारोप पत्रात म्हटले आहे.दरम्यान, इसीसच्या कारवायांसाठी व्हाट्सअप ग्रुप तयार करण्याची जबाबदारी झोयबवर होती आणि त्यातून 50 तरुण हे त्याच्या संपर्कात असल्याची देखील माहिती समोर आली. त्यामुळे संभाजीनगर शहरात सध्या एकच खळबळ उडालेली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.