जालना: राज्यातील गृहखातंच नाही तर राज्य सरकारच संशयाच्या घेऱ्यात अडकल्याची टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी राज्य सरकारवर केलीय. ते भोकरदनमध्ये (Jalna) पत्रकारांशी बोलत होते. सबळ पुरावे देऊनही पोलीस भाजपच्या नेत्यांवर कारवाई करत नसल्याने गृहखाते शिवसेनेकडे (Shivsena) देण्याची मागणी शिवसेनेनं केलीय. यावर बोलताना गृहखाते काय भाजपच्या नेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी तयार केलं आहे का असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादीकडून (NCP) मुख्यमंत्री पदावर दावा करण्यात येत येतोय मात्र राज्यात विकासाची घडी विस्कटल्यानं शिवसेना आणि राष्ट्रवादी मुद्दामहून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी उपद्व्याप करत असल्याचा टोलाही दानवे यांनी लगावला आहे. ("Is the state home department set up to monitor BJP leaders?" Raosaheb Danve Slams MVA Government)
हे देखील पहा -
शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान व्हावे यासाठी राष्ट्रवादीने अनेक वेळा ठराव घेतले. शरद पवार चांगले नेते आहेत मात्र युती असेल तर 6 जागा आणि युती नसेल तर 4 जागा त्यांच्या पक्षाला मिळतात. 6 खासदारावर कुणीही पंतप्रधान होत नाही हे शरद पवारांना देखील माहित आहे. तरीही त्यांच्या पक्षाने ठराव घेतला याबाबत अधिक न बोललेलं बरं असं सांगत दानवे यांनी या विषयावर अधिक बोलण्यास नकार दिला.
जयंत पाटील (Jayant Patil) यांनी काल उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान उत्तर प्रदेश म्हणजे भारत नव्हे असा टोला भाजपला लगावला होता. यावर देखील दानवे यांनी भाष्य केलं. देशाच्या पंतप्रधानाचा रस्ता हा उत्तर प्रदेशातून जातो असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच नेते म्हणतात. आता भाजपची सत्ता तिथे आल्याने ही 2024 च्या निवडणुकीची नांदी असून आज उत्तर प्रदेश आमच्या ताब्यात आल्याने उत्तर प्रदेश म्हणजे देश नाही असं त्यांना वाटत असल्याची टीका दानवे यांनी केली.
राज्यात सध्या कोळसा तुटवडा निर्माण झाल्याने काही विद्युत प्रकल्पात काही दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा आहे. यावर बोलताना दानवे म्हणाले की, राज्यात कोळशाची कृत्रिम तुटवडा असून कोळसा खात्याने सर्व राज्यांना पत्र पाठवून कोळशाचा साठा करून ठेवण्याचं आवाहन केलं होतं. कोळशाचे राज्याकडे 3 हजार कोटी थकीत असून राज्य कोळसा नाही असं सांगत असलं तरी वीज निर्मिती करून वीज विकली जात असल्याचा आरोप दानवे यांनी राज्य सरकारवर केला आहे. तरीही आमच्याकडून कोळसा पुरवण्यात कोणतीही कमी नसून राज्यात मुद्दामहून कोळशाची कृत्रिम टंचाई निर्माण करून भ्रष्टाचार करण्याचा प्रकार सुरू असल्याचे दानवे म्हणाले.
लोकांना विकासाची गरज आहे. काँग्रेसच्या ज्या आमदारांना मतदार संघात विकासासाठी निधी मिळत नाही ते आमदार पुन्हा निवडून येतील का असा सवाल उपस्थित करत आमच्या संपर्कात किती नाराज आमदार आहे, हे नाराज आमदारांची पत्रकारांनी भेट घेतल्यानंतरच कळेल. शिवाय राज्यातील नाराज आमदार आणि आमच्यात काय बोलणं सुरू आहे हे देखील उघड होईल असंही दानवे यांनी म्हटलंय.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.