लातूर : वन्यप्राण्यांची तस्करी करणं गुन्हा असताना पैश्याच्या हव्यासापोटी मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांची तस्करी केली जाते. लातुर (Latur) जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भादा पोलिसांनी कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील तस्करांना अटक केली असून यात आंतरराज्य रॅकेट असण्याची शक्यता भादा पोलिसांनी वर्तवली आहे.
हे देखील पहा :
त्यातील 6 व्यक्तीला चौकशी केली असता त्यांनी दुर्मिळ जातीच्या मांडूळ सापाची तस्करी करत असल्याचं आढळून आले. त्यातील माणिक शंकर तळकरी, शोएबउल्ला ऍतेशाम खान, बाबूमियाँ महेबूबसाब जनगा, महमद समीर महमद सद्दाम लदाफ, दयानंद बालविर सरतापे सिराज महमद ईरफान हासन यांना अटक केली आहे.
अडीच ने तिन फूट लांबीचे व 3 किलो वजनाचा 70 हजार किमंतीचा दुर्मिळ मांडूळ, 4 लाख 50 हजार रुपयांची इनोव्हा कार, आरोपी सोबत असलेले गुन्ह्यात वापरलेले मोबाईल (Mobile) फोन व रोख रक्कम असा एकूण 5 लाख 61 हजार सहाशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस (Police) निरीक्षक विलास नवले करत आहेत.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.