Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरकडं आलीशान कार आलीच कशी? चिट फंड घोटाळ्यातील महेश मोतेवारशी कनेक्शन

Prashant Koratkar Rolls-Royce : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्या आणि इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरकडे रोल्स रॉयस कार कशी आली? याचा तपास सीआयडी करत आहे.
Prashant Koratkar Rolls-Royce
Prashant Koratkar Rolls-RoyceSaam Tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरुन दिलेल्या धमकी प्रकरणात अपडेट समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्या आणि इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरकडे रोल्स रॉयस ही आलिशान कार कशी आली याचा सीआयडीने तपास सुरु केला आहे. ही कार चिट फंड घोटाळ्यातील आरोपी महेश मोतेवारच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे.

प्रशांत कोरटकरकडे असलेली कोट्यावधी रुपयांची रोल्स रॉयस कार ही मोतेवारच्या समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या नावावर आहे. चिट फंड घोटाळ्यावरुन जेव्हा महेश मोतेवारला अटक झाली होती, तेव्हा ही कार सीबीआयने ब्लॉक केली होती. परिणामी सीबीआयने या कारवर विकायला बंदी घातली होती. असे असूनही रोल्स रॉयस कार प्रशांत कोरटकर वापरत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सीआयडीकडून या कारबद्दल ईमेलद्वारे गाडीबद्दल माहिती विचारण्यात आली आहे.

महेश मोतेवारवर चार हजार सातशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. डिसेंबर २०१५ मध्ये पोलिसांनी मोतेवारला अटक केली होती. देशातील २२ राज्यांमध्ये मोतेवारच्या नावावर २८ गुन्ह्यांची नोंद झाली. मोतेवारची संपत्ती जप्त करुन त्यांचा लिलाव करण्यात आला. याच दरम्यान मोतेवारची रोल्स रॉयस कार ब्लॉक करण्यात आली होती. मग ही कार प्रशांत कोरटकरकडे कशी आली याचा तपास सीआयडी करत आहे. या कारची किंमत सात ते आठ कोटी रुपये आहे असे म्हटले जात आहे.

Prashant Koratkar Rolls-Royce
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड हातात बेड्या घालून विधान भवनात, नेमकं प्रकरण काय? VIDEO

इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात नागपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास कोल्हापूर पोलीस करणार आहेत. नागपूर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा कोल्हापूर पोलिसांकडे गेल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूरच्या प्रकरणात कोरटकरला अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

Prashant Koratkar Rolls-Royce
Maharashtra Politics: मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा उपाध्यक्ष पद मिळणार? कोणत्या नेत्याची होतेय चर्चा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com