देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी असलेल्या इंडिगो एअरलाइन्सची सुविधा कोलमडली... आणि गेल्या पाच दिवसांपासून या कंपनीची विमानसेवा विस्कळीत झाली... हजारो प्रवाशांना याचा फटका बसला...मात्र इंडिगोच्या या विस्कळीत विमानसेवेचा केवळ सामान्य नागरिकांना किंवा सिनेस्टारर्सनाच फटका बसला असं नाही तर याचा फटका महाराष्ट्रातील मंत्री, आमदार आणि अन्य नेतेमंडळींनाही बसलाय...
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत असल्यानं राज्यातील मंत्री, आमदारांनी नागपुरात पोहोचण्यासाठी इंडिगोचे तिकिट काढलं... मात्र कंपनीची विमानसेवाच ठप्प झाल्यानं राजकीय नेत्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला... अनेकांनी पर्यायी मार्गाचा वापर करत.. नागपूरकडे कूच केली...
मंत्री पंकजा मुंडे, आदिती तटकरे, नितेश राणे, जयकुमार रावल मुख्यमंत्र्यांच्या चार्टर्ड प्लेनने नागपुरात पोहचले... तर मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराजे देसाई,प्रताप सरनाईक, दत्ता भरणे हे खासगी चार्टर्ड प्लेननं नागपूरात दाखल झाले...त्याव्यतिरिक्त मंत्री गिरीष महाजन, हसन मुश्रीफ, रेल्वेनं नागपूरात पोहचले.. तर आमदार आदित्य ठाकरे एअर इंडियाने नागपुरात अधिवेशानासाठी गेले... तर आमदार भास्कर जाधव, अनिल परब, मंत्री संजय राठोड रेल्वेने नागपुरात पोहचले... तर आमदार चेतन तुपे, हेमंत रासने कारने नागपूरच्या दिशेने रवाना झाले...
दरम्यान ऐन हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेमुळे मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालंय. धावपळ करत आलेले सत्ताधारी आता अधिवेशनात विरोधकांच्या टीकेला कसे सामोरे जातात ते पाहायचं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.