मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; पोलिसांचा अहवाल न्यायालयात रद्द

या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाखाली तपास केल्याचे दिसत आहे.
मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; पोलिसांचा अहवाल न्यायालयात रद्द
मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; पोलिसांचा अहवाल न्यायालयात रद्दSaam Tv
Published On

औरंगाबाद - राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख Mehaboo Shaikh प्रकरणावरून औरंगाबाद पोलीस Aurangabad Police पुन्हा उघडे पडले आहेत. कारण राष्ट्रवादी युवक काँग्रेस Congress प्रदेशाध्यक्ष महेबूब इब्राहिम शेख यांच्याविरुद्ध बलात्काराच्या दाखल गुन्ह्यात काहीही तथ्य नसल्याचा पोलिसांनी दिलेला बी समरी अहवाल न्यायालयाने फेटाळला आहे. यात आता महेबूब शेख यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाखाली तपास केल्याचे दिसत आहे. फिर्यादी तथा पीडितेच्या म्हणण्याऐवजी आरोपीच्या म्हणण्याच्या अनुषंगाने तपास करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

हे देखील पहा -

महिला फिर्यादीलाच या प्रकरणात खोटे ठरविण्याचा प्रयत्न केलेला दिसत असून या प्रकरणात आता सिडको पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी तपास करावा. तसेच या तपासावर पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी स्वतः देखरेख करावी आणि योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन करावे, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

विशेष बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पहिल्या दोन ते तीन दिवसांतच पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे यांनी रात्री ९ वाजता घाईघाईने पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात कुठलेही तथ्य नसून तांत्रिक पुराव्यानुसार महेबूब शेख हे आरोपी नाहीत, असे सांगितले होते. सीसीटीव्हीतही दोघे कुठे भेटल्याचे पुरावे नाहीत. शिवाय सीडीआर तपासातही शेख आरोपी असल्याचे निष्पन्न होत नसल्याचे ते म्हणाले होते. त्यावरूनच पोलिसांनी बी समरी अहवाल सादर केला. मात्र, हा अहवाल फेटाळल्यामुळे शेख आणि पोलिसांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढ; पोलिसांचा अहवाल न्यायालयात रद्द
विखे पाटलांच्या तालुक्यात दुपटीने वाढले बाधित! लसही कोणी घेईना

काय आहे नेमके प्रकरण?

मेहबूब इब्राहिम शेख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष याच्याविरुद्ध २८ डिसेंबर २०२० रोजी सिडको पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २९ वर्षीय उच्चशिक्षित पीडित तरुणीने ही फिर्याद नोंदविलेली आहे. नोकरीचे आमिष दाखवून मुंबईला नेण्यासाठी म्हणून १४ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री शेख याने कारमध्येच अत्याचार केला. प्रतिकारही केल्यानंतरही त्याने तोंड दाबून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यावर महेबूब शेखने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना आरोप फेटाळले होते.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com