- बालाजी सुरवसे
Omprakash Rajenimbalkar News : आगामी काळात हाेणा-या अधिवेशनात मराठा आरक्षण (maratha reservation) वाढवा अशी धाराशिवचे उद्धव ठाकरे गटाचे (uddhav thackeray faction) खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (MP Omprakash Rajenimbalkar) यांनी केंद्र सरकारला केली आहे. दरम्यान आजही महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज आंदाेलन करीत आहे. (Maharashtra News)
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले केंद्र सरकारने 18 तारखेच्या अधिवेशनात मराठा आरक्षण मर्यादा वाढवावी अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. तसेच आधी मराठा समाजाला दिलेले आरक्षण सदावर्ते सारख्या माणसाला कोर्टात पाठवुन रद्द केले गेले असा ही आरोप खासदार राजेनिंबाळकर यांनी केला आहे.
खासदार राजेनिंबाळकर म्हणाले दोन्ही सरकार तुमची आहेत. भरपुर इंजिने आहेत. ट्रिपल इंजिन सरकारचा उपयोग काय असं म्हणत मराठा आरक्षणासाठी मर्यादा वाढवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ट्रिपल इंजिन सरकारने मदत घ्यावी.
फार गतिमान सरकार असेल तर अधिवेशनात आरक्षण मर्यादा वाढवावी व कुणबी आरक्षण देऊन थातूरमातूर मलमपट्टी करू नका. ठोस कायदा करा आम्ही ठाकरे गट पाठिंबा देऊ असेही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.