२ मुलांसह आईनं विहिरीत उडी मारून आयुष्य संपवलं; आलेगाव शिवारातील घटनेनं हळहळ

आलेगाव शिवारात आत्महत्या केल्याची घटना
solapur crime
solapur crimeSaam Tv
Published On

सोलापूर : सोलापूर (Solapur) येथील आलेगाव शिवारात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आईने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या आत्महत्येची नोंद वळसंग पोलिस ठाण्यात (Police Station) रात्री उशिरा करण्यात आली.

हे देखील पाहा-

दरम्यान, सोनाली सिद्राम चोपडे, मोठा मुलगा संतोष सिद्राम चोपडे (वय- ८), लहान मुलगा संदीप चोपडे (वय- ५) सर्व राहणार तिल्हेहाळ तालुका दक्षिण सोलापूर यांनी आलेगाव येथील शिवारातील शेत गट नंबर ३०/ २ चे मालक दयानंद वसंत शिंदे यांचे शेतातील विहिरीतील पाण्यात पडून बुडून मयत झाले आहे.

solapur crime
'गरीब के हड्डी पे मोदी सरकार कबड्डी खेल रही है'- अतुल लोंढे

यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस (Police) करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com