नितिन गडकरी यांच्या हस्ते देशातील पहिल्या एलएनजी स्टेशनचे उद्घाटन

हा एलएनजी प्रकल्प बैद्यनाथ ग्रुपच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे.
नितिन गडकरी यांच्या हस्ते देशातील पहिल्या एलएनजी स्टेशनचे उद्घाटन
नितिन गडकरी यांच्या हस्ते देशातील पहिल्या एलएनजी स्टेशनचे उद्घाटनSaam Tv
Published On

संजय डाफ

नागपूर - नागपुरात Nagpur देशातील पहिल्या एलएनजी स्टेशनचे उद्घाटन Inauguration केंद्रीय मंत्री नितिन गडकरी Nitin Gadkari यांच्या हस्ते करण्यात आले आहे.  हा एलएनजी LNG प्रकल्प बैद्यनाथ ग्रुपच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. एलएनजी प्रकल्प हा पर्यावरणाच्या दृष्टीने पूरक असून या माध्यमातून पेट्रोल Petrol आणि डिझेलला Diesel पर्याय मिळणार असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहेत. Inauguration of first LNG station by Nitin Gadkari

सोबतच पुढील तीन महिन्यात आम्ही निर्णय घेणार आहोत की ऑटो मोबाइल कंपनीन्यानी With flex इंजिन गाड्या द्यावा असेही ते यावेळी म्हणले. गॅस पेट्रोल डीझल यानंतर आता देशात वाहतुकीसाठी एलएनजी म्हणजे लिक्विफाईड नेचर गॅस चा वापर करता येणार असून हे स्वस्त आणि पर्यावरण पूरक असणार आहे. याच पाहिले स्टेशन नागपुरात उभारण्यात आले आहे.

हे देखील पहा -

 ट्रक आणि जड वाहनांसाठी सध्या याचा उपयोग होणार असून यासाठी एक किट बसवावी लागणार आहे. ती किट सुद्धा याच प्रकल्पाच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे. डीझल वर चालणारे ट्रक आता या गॅस वर चालल्यास स्वस्त तर पडणार आहेच सोबतच पर्यावरण पूरक सुद्धा राहणार आहे. आज नागपुरात पाहिले स्टेशन साकार झाले याचा मोठा आनंद होत असल्याचे केंद्रीय  मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहेत.

नितिन गडकरी यांच्या हस्ते देशातील पहिल्या एलएनजी स्टेशनचे उद्घाटन
मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

पुढे ते म्हणाले की, एलएनजीमुळे १ ट्रकमागे ११ लाख रुपये एका वर्षामध्ये वाचतील. सीएनजी आणि एलएनजी  हे पुढील भविष्य आहे.  प्रदूषणापासून पर्यावरणाच पण रक्षण होणार आहे , सोबतच पेट्रोल डीझलच्या तुलनेत ते परवडणार असणार आहे. हेवी ट्रक मध्ये डीझलचा मायलेज २ किमी चा आहे तर एलएनजी मध्ये ४ किमी चा होईल.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com