धक्कादायक! तिघांच्या भांडणात चौथ्याचा चाकूने भोकसून खून

मित्राच्या प्रेम पोटी त्याने भांडण सोडवत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला पण ही मध्यस्थी त्याच्या जीवावर बेतली.
Nashik News
Nashik NewsSaam Tv
Published On

तबरेज शेख

नाशिक - मित्राच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या मित्राला तिघा जणांनी चाकूने भोकसून खून केल्याचा प्रकार शनिवार शिवाजी वाडी मुंबई नाका येथे उघडकीस आला आहे. या तरुणाचा गंभीर जखमी अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी संशयित भारत भोये, गणेश भोये, गौतम भोये या संशिताना पोलिसांनी (Police) अटक केली आहे.

हे देखील पाहा -

प्रकाश रावसर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुलगा सागर हा संकेत कोरडे याचा बालपणीचा मित्र आहे. संकेत कोरडे याचे भोये यांच्या घरातील एका मुली सोबत एक वर्ष पूर्वी प्रेम संबंध होते. शनिवारी कोरडे आणि भोये कुटुंबियातील बायकांमध्ये भांडण झाले. हे भांडण सुरू असताना दोन्ही कुटुंबातील पुरुषांमध्ये एकमेका सोबत भांडण झाले. सागरने संकेत यास समजून सांगत तू भांडण करू नको पोलिसांत तक्रार दे असे सांगितले. याचा भोये कुटुंबियांना राग आला. संकेत पोलीस ठाण्यातून आल्या नंतर संशितानी सगार वर हल्ला केला.

Nashik News
संभाजीराजेंना पुढे करून राजकारण करणाऱ्यांची उडी फसली: संजय राऊतांचा हल्लाबोल

छातीत चाकू लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मुंबई नाका पोलिसांना संशयितांना अटक केली आहे. वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहो यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. मयत सागर संकेत बालपणीचे मित्र आहे.मित्राच्या प्रेम पोटी त्याने भांडण सोडवत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला पण ही मध्यस्थी त्याच्या जीवावर बेतली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com