नियम पाळा; रायगडकरांकडून तीन महिन्यांत दीड कोटींचा दंड वसूल
नियम पाळा; रायगडकरांकडून तीन महिन्यांत दीड कोटींचा दंड वसूलराजेश भोस्तेकर

नियम पाळा; रायगडकरांकडून तीन महिन्यांत दीड कोटींचा दंड वसूल

कोविड काळातील प्रतिबंधात्‍मक नियमांचे उल्‍लंघन केल्‍याप्रकरणी मागील 3 महिन्‍यांमध्‍ये रायगड जिल्‍हयात तब्‍बल दीड कोटीहून अधिक रकमेची दंडवसुली करण्‍यात आली आहे.
Published on

राजेश भोस्तेकर,रायगड

रायगड - कोविड काळातील प्रतिबंधात्‍मक नियमांचे उल्‍लंघन covid rules broken केल्‍याप्रकरणी मागील 3 महिन्‍यांमध्‍ये रायगड raigad जिल्‍हयात तब्‍बल दीड कोटीहून अधिक रकमेची दंडवसुली fine collected करण्‍यात आली आहे. कोरोनाच्‍या दुसऱ्या लाटेत second wave of covid या आदेशाचे उल्‍लंघन करणाऱ्यांवर मोठया प्रमाणावर दंडात्‍मक कारवाईचा बडगा उगारण्‍यात आला. 1 एप्रिल 2021 ते 30 जून 2021 या कालावधीत पोलीस police प्रशासनाकडून 1 कोटी 32 लाख आणि ग्रामपंचायत grampanchayat तसेच नगरपालिका nagarpalika यांसारख्या स्थानिक प्रशासनाकडून local government 21 लाख 56 हजार 450 अशी एकूण 1 कोटी 53 लाख 56 हजार 450 रुपये एवढी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. In the last 3 months, more than Rs. 1.5 crore penalty has been recovered in Raigad district.

हे देखील पहा -

रायगड जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट एप्रिल महिन्यात सुरू झाली. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात पुन्हा निर्बंध restriction लागू करण्यात आले. प्रशासनाकडून कोरोनाच्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे अशा सूचना वारंवार देण्यात आल्या होत्या. मात्र नागरिकांकडून सतत कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन होत होते. याबाबत जिल्हा पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला होता.

नियम पाळा; रायगडकरांकडून तीन महिन्यांत दीड कोटींचा दंड वसूल
15 जुलै पासून शाळांच्या घंटा पुन्हा वाजणार; 8 वी ते 12 वी शाळा सुरू

रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस आणि स्थानिक प्रशासन असलेले ग्रामपंचायत, नगरपरिषद याच्या मदतीने तपासणी नाके तयार करण्यात आले होते. विना मास्क फिरणारे, वाहतूक नियम मोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली होती. 1 एप्रिल ते 30 जून दरम्यान हजारो नागरिकांनी कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन केल्याबाबत दीड कोटी दंड वसूल केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com