सांगली : मातेने चक्क बसमध्येच बाळाला जन्म दिल्याची घटना आज सांगलीच्या भोसे येथे घडली आहे.. तर आई आणि बाळाला भोसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.. दोघांची तब्यत चांगली आहे.. मात्र बस चालक आणि प्रवाशी यांनी माणुसकीचे दर्शन घडवुन दिले. (In Sangli, the mother gave birth to the baby in the bus, both are safe)
हे देखील पहा -
जत सांगली कोल्हापुर बस आज सकाळी जत हुन कोल्हापूर कडे रवाना झाली. या बस मध्ये जत मधील गोंधळेवडी येथील कुटुंब दवाखान्यात जाण्यास चढले होते. बस कवठेमहांकाळच्या पुढे गेल्या नंतर वनिता शामराव गळवी यांच्या अचानक पोटात दुखू लागले. तेव्हा थोड्यावेळ बस मध्येच रस्त्यात थांबवली आणि वनिता यांनी गोंडस बाळाला जन्म दिला.
वनिता यांना घेऊन बसमधील प्रवासी आणि बसचे चालक वाहक यांनी पुढे असणाऱ्या भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. बाळ आणि आई दोघांची तबेत चांगली आहे. तर चालक B.T. माने आणि वाहक S.S. चव्हाण यांचे जत मधील आगार व्यवस्थापक यांनी सत्कार केला आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.