घरात घुसलेल्या चोरट्यांशी डॉक्टर एकटेच झुंजले, पाठलाग केला, पण शेवटी...

चोरटे डॉक्टरांच्या घरात घुसले आणि जवळपास ८ लाख रुपये किमतीचे दागिने त्यांनी चोरले.
Theft
Theft Saam TV
Published On

मंगेश मोहिते -

नागपूर : नागपुरात मध्यरात्रीच्या सुमारास रामदासपेठ परिसरातील एका डॉक्टरांच्या घरात चोरी झाली आहे. चोरटे घरातील ८ लाख रुपय किमतीचे दागिन्यांची चोरी करुन पळ काढत असतानाच डॉक्टर घरी पोहचल्याने एका चोराला (Thief) स्वत: डॉक्टरांनी त्यांचा पाठलाग करुन पकडलं मात्र, चोरी केलेला माल मात्र हाती लागला नाही.

नागपुरमधील (Nagpur) रामदास पेठ परिसरात राहणारे डॉ. भावेश बरडे हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. २१ तारखेला ते घरात एकटे असताना त्यांना रुग्णालयातून रात्रीच्या वेळी फोन आला, फोन आल्याने ते रुग्णाला तपासण्याकरीता रात्रीच रुग्णालयात गेले. डॉक्टर रुग्णालयात गेल्याच्या संधीचा फायदा घेत दोन चोरटे डॉक्टरांच्या घरात घुसले आणि जवळपास ८ लाख रुपये किमतीचे दागिने त्यांनी चोरले. मात्र, तेवढ्यात डॉक्टर आपलं काम आटपून घरी परतले असता त्यांनी कोणतरी दोन व्यक्ती घराच्या भिंतीवरून उडी मारून जाताना दिसले.

Theft
अकोल्यात पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या! सुसाईड नोटमध्ये लिहिले कारण...

डॉक्टरांनी धाडस दाखवत त्यांचा पाठलाग केला आणि एका चोरट्याला पकडण्यात यश मिळवलं. मात्र, दुसरा चोरटा फरार झाला आहे. दरम्यान, फरार असलेल्या आरोपीवर वेगवेगळ्या भागात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत. डॉक्टरांनू धाडस दाखवत एका चोराला पकडलं, मात्र फरार झालेला दुसरा चोरच सगळा मुद्धेमाल घेऊन पळाला असल्याने डॉक्टरांनी चोरांना पकडलं असलं तरी चोरीचा माल मिळाला नाही. त्यामुळे फरार असणाऱ्या चोराला पकडून मुद्देमाल रिकव्हर करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com