प्रेमाचा करूण अंत! नागपुरात प्रेमीयुगुलाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या
नागपूर - एकमेकांवरील प्रेम आणि घरच्यांकडून संभाव्य विरोध यातून अल्पवयीन प्रेमीयुगुलाने टोकाचे पाऊल उचलत धावत्या रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवीन कामठी पोलीस (Police) ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. 18 वर्षीय तरुण आणि 16 वर्षीय तरुणीने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केली आहे. काल रात्री 8 च्या जवळपास कन्हान रेल्वे पुलियाजवळील 100 मीटर दूर अंतरावरील कामठी रेल्वे ट्रॅकवर दोन्ही प्रेमी जोडप्यानी हातात हात घालून हावडा अहमदाबाद (Ahmedabad) धावत्या रेल्वेगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
हे देखील पहा -
हे दोघेही शहरातील जयभीम चौक येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. घरच्यांना दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागल्याने आणि विरोध असल्यानं या टोकाचे पाऊल उचलले. तरुणाचे नाव आदित्य कुरील वय 18 वर्षे तर मृतक मुलगी ही 16 वर्षाची अल्पवयीन आहे. दोन दिवसांपूर्वी हे दोघेही बेपत्ता झाल्याने मुलीच्या घरमंडळीने कामठी पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदविली असता पोलिसांनी मिसिंगची तक्रार नोंदवित तपासाला गती दिली.
मात्र कुठेही थांगपत्ता लागला नव्हता तर काल रात्री या दोघांनीही धावत्या रेल्वेगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. पोलीस या घटनेचा पंचनामा करीत असून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकोय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास सुरू आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.