Mumbai Crime News: मुंबईत चोरांचा सुळसुळाट; ६ लाखांहून अधिक रक्कम लंपास; काही तासांतच पोलिसांनी आवळल्या मुसक्या

घरफोडीची तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच तासातच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSanjay Gadade, Saam TV

संजय गडदे

Mumbai Crime News: मुंबईत मागील काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशाच एका घरफोडीच्या घटनेचा उलगडा मुंबईच्या सांताक्रुज पोलिसांनी केला आहे. घरफोडीची तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच तासातच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्यात.

चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. उदित रामसिंग पाल (२० वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून पोलीसांनी त्याच्याकडून ६,५६,२०८/- रुपये हस्तगत केले आहेत. (Latest Mumbai Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रुज जुहू परिसरातील एका दुकानामध्ये १५ जानेवारी रोजी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास दुकानात चोरी करण्याच्या उद्देशाने अनोळखी व्यक्ती दुकानात शिरला आणि लपून राहिला. दुकानातील फिर्यादी आणि इतर कर्मचारी दुकान बंद करून गेल्यानंतर दुकानातील कॅश ड्रॉवरमधील एकूण रोख रक्कम ६,५६,२०८ रु. चोरी करून त्याने पळ काढला. अशी तक्रार फिर्यादी यांनी मंगळवारी दिली. दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Mumbai Crime News
Crime News : दारू विक्रेत्यांकडून पोलिस कॉन्स्टेबलची हत्या; मन सुन्न करणारी घटना, आरोपी फरार

गुन्हा दाखल होताच पोउनी धनंजय आव्हाड आणि गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी घटनास्थळी भेट देऊन, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यात त्यांनी फुटेजमधील आरोपीच्या देहबोलीवरून, दुकानात हाऊस किपींगचे काम करणाऱ्या वीस वर्षीय तरुणास ताब्यात घेतले. त्याच्या राहत्या घरात जवळचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यानेच घरफोडी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली.

Mumbai Crime News
Mumbai Crime News : छोटा राजनचा वाढदिवस साजरा करणं भोवलं; ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला केली पोलिसांनी अटक

विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली संपूर्ण मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच गुन्हेगाराला बेड्या ठोकल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com