Imtiyaz Jaleel on Navneet Rana: ...तर अमरावतीत नवनीत राणा विरोधात निवडणूक लढणार; जलील यांची मोठी घोषणा

मलकापूरच्या घटनेत कोणतेही चुकीचे नारे लावले गेले नाहीत पोलिसांनी त्याचा तपास करावा असे खुले आव्हान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी दिले.
Imtiyaz Jaleel on Navneet Rana
Imtiyaz Jaleel on Navneet RanaSaam Tv
Published On: 

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरच्या घटनेत कोणतेही चुकीचे नारे लावले गेले नाहीत पोलिसांनी त्याचा तपास करावा असे खुले आव्हान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी दिले. एका मीडियाने ती बातमी चुकीची चालवली व त्यानंतर अन्य मीडियाने बातमी चालवली. (Latest Marathi News)

Imtiyaz Jaleel on Navneet Rana
Maharashtra Politics: फडणवीस, शेलार आमच्या मालकांकडे समर्थनासाठी चपला घासतात, मनसे आमदार राजू पाटील यांची टीका

आमच्या वाट्याला कुणी जाऊ नये, गेले तर त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. नाशिकमध्ये 10 दिवसात दोन मुलांची भर दिवसा हत्या करण्यात आली. त्या आरोपीला तुम्ही पकडत नसाल तर तुम्ही तुमची वर्दी उतरवली पाहिजे. तुम्ही वर्दीच्या लायक नाही म्हणत नाशिकच्या (Nashik) पोलीस अधीक्षकांचा जलील यांनी निषेध केला. (Buldhana News)

Imtiyaz Jaleel on Navneet Rana
Devendra Fadnavis Statement: उद्धवजी माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचा इशारा; म्हणाले, 'ज्यांच्या अलमारीत सांगाडे...'

तर खासदार जलील यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावरही टीका केली, नवनीत राणा या धर्माचा राजकारणासाठी वापर करित आहेत. राजकारण खालच्या स्तरावर होत राहिलं तर हा देश कुठे जाईल याचा देखील विचार करावा असे जलील यानी सांगितले. तर असुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी परवानगी दिली तर नवनीत राणा विरोधात अमरावती लोकसभेतुन निवडणूक लढवनार असे देखील जलील यांनी येवेळी जाहीर केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.