Maratha Reservation: 'परिस्थिती सरकारच्या नियंत्रणाबाहेर, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा...' माजी मंत्र्याची मोठी मागणी

Maratha Reservation Protest: राज्यपालांनी पुढाकार घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा असेही या पत्रात म्हणले आहे.
Maratha Reservation
Maratha ReservationSaam tv news
Published On

संजय जाधव, प्रतिनिधी

Buldhana News:

महाराष्ट्रातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था ची स्थिती लक्षात घेता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मोठी मागणी ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राज्यपालांकडे केली आहे. तसेच राज्यपालांनी पुढाकार घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा असेही त्यांनी या संदर्भात दिलेल्या लेखी पत्रात म्हणले आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) लढा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देत राज्यभरात उपोषणे, आंदोलने केली जात असून हिंसाचाराच्याही घटना समोर येत आहेत. त्यामुळे एकूणच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी.. अशी मोठी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी (Subodh Savaji) यांनी केली आहे.

"मराठा आरक्षण व जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे सर्वपक्षीय, सर्व जाती धर्माचे नागरिक, मराठा समाज नेते, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. एकूण परिस्थिती सरकारच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. एकूण परिस्थिती सरकारच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे..." असे सावजी यांनी आपल्या पत्रामध्ये म्हणले आहे.

Maratha Reservation
Maharashtra Politics: 'संसदरत्नांनी आम्हाला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नये..' सुनील तटकरेंचा सुप्रिया सुळेंना टोला

तसेच या पत्रात पुढे त्यांनी "मराठा युवकांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शासन निष्क्रिय असून जनजीवन १०० टक्के विस्कळीत झाले आहे. भूतो ना भविष्यती असे सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होत आहे. त्यामुळे स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी.. अशी मागणी त्यांनी केली आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Reservation
Maval News : मनमानी विराेधात एकवटले शेतकरी, श्री संत तुकाराम साखर कारखान्यावर उद्या काढणार माेर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com