IMD Rain Alert : शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! विदर्भ, मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज

Weather Update : पुणे, कोल्हापूर, सांगली, अकोला, वाशीम, यवतमाळ यथे तापमानाचा पारा ३५ अंशांच्या वर आला आहे.
Rain
RainSaamTv
Published On

Pune News :

उत्तर भारतात थंडीचं प्रमाण कमी-अधिक होताना दिसत आहे. तर राज्यात थंडीचं प्रमाण हळूहळू कमी होत आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे उन्हाचे चटके बसू लागले आहेत. तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज आहे. (Latest Marathi News)

पावसाला पोषक असं वातावरण तिथे राहिल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात आजपासून ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तर ९ फेब्रुवारीलाहलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पूर्व विदर्भापासून तेलंगण, कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rain
Rakesh Tikait: मराठा आरक्षण आंदोलनावर राकेश टिकैत यांनी मांडलं आपलं मत, मनोज जरांगे यांच्याबद्दल म्हणाले...

तापमानात वाढ

पुणे, कोल्हापूर, सांगली, अकोला, वाशीम, यवतमाळ यथे तापमानाचा पारा ३५ अंशांच्या वर आला आहे. किमान तापमानाचा पारा ११ ते २२ अंशांच्या दरम्यान असून, थंडी कमी झाली आहे. आज देखील तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

Rain
Koyna Dam Water Tourism: कोयना जलाशयावर मौजे मुनावळे येथे जलपर्यटनाचा होणार विकास

उत्तर भारतात थंडी कायम

उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे. दिल्लीत थंड वाऱ्यांमुळे थंडी कायम आहे. दिवसा ऊन आणि हलक्या पावसाचीही शक्यता आहे. थंड वाऱ्यांमुळे थंडी वाढली असली तरी दिल्ली-एनसीआरमधील नागरिकांना प्रदूषणापासून मोठा दिलासा मिळाला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह डोंगराळ राज्यांमध्ये झालेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतात बर्फाळ वारे वाहत आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब आणि हरियाणामध्ये थंडी कायम राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com