हॉटेल व्यवसाय करताना सर्वात मोठी आणि सर्वांना येणारी अडचण म्हणजे मनुष्यबळ. प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्यामुळे हॉटेल व्यवसाय करायचं धाडस होत नाही किंवा सुरू झालेली हॉटेल माणसांअभावी बंद करावी लागतात. यालाच उपाय म्हणून कोल्हापूरमधील एका हॉटेल व्यवसायिकांने हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करण्यासाठी थेट रोबोट आणलेत.
कोल्हापुरातल्या उद्यम नगरात सुरू झालेल्या इडली स्क्वेअर (idli square kolhapur) या हॉटेलमध्ये हा प्रयोग करण्यात आला आहे. तैवानहून आणलेले हे रोबोट बॅटरीवर चालतात. या रोबोटला टेबल नंबरवर जायच्या सूचना दिल्या की, त्या टेबलवर रोबोट जातो आणि ग्राहकाची ऑर्डर पोहोच करतो. त्यानंतर ग्राहकाने एक्झिट बटन दाबलं की पुन्हा तो किचनमध्ये जातो.
या रोबोटमुळे हॉटेलमधील कामात सुसूत्रता येतेच, त्याचबरोबर ग्राहकांनाही या रोबोटचे आकर्षण आहे. अनेकजण या रोबोट बरोबर सेल्फी काढत आहेत. याआधी देशात चेन्नई आणि दिल्लीत अशा प्रकारचे रोबोट आणले गेले आहेत, मात्र महाराष्ट्रात पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये हा प्रयोग केला गेला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.