संजय जाधव
बुलडाणा: जिल्ह्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून चिखली तालुक्यातील वायाळ दांपत्याने विषारी औषध प्राशन करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. यात पत्नी आशा वायाळ यांचा मृत्यू झाला असून पती राजेंद्र वायाळ याच्यावर बुलडाणा सामान्य रुग्णलयात उपचार झाले असून त्यांची प्रकृती आता बरी आहे. (Buldana Crime News Updates)
चिखली तालुक्यातील अमडापूर येथील अवैध सावकार शुभम लेकुरवाळे याच्या कडून राजेंद्र वायाळ यांनी 20 हजार रुपये कर्जाने घेतले होते. ज्यासाठी व्याजापोटी प्रति दिवस त्यांना तब्बल 700 रुपये या अवैध सावकारास द्यावे लागत होते. दीड महिन्यात या सावकाराला तब्बल 30 हजार रुपये देऊन सुद्धा हा सावकार पैश्यांसाठी वायाळ दाम्पत्याचा छळ करत होता.
राजेंद्र वायाळ हे मिस्त्री काम करून कसबस आपलं घर चालवतात. अशात इतक्या मोठ्या रकमेचा भरणा करण्यासाठी त्यांनी नातेवाईकाना पैशाची मागणी केली मात्र पैसे उपलब्ध न झाल्याने हा अवैध सावकार त्यांना गावात येण्यास मज्जाव करत. त्यांनी रस्त्यातच टाकरखेड मुसलमान शिवारात उंदीर मारण्याचे औषध खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.. या वेळी दोघांनाही उपचारार्थ बुलडाणा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
हे देखील पहा-
मात्र, उपचारादरम्यान पत्नी आशा वायाळ यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अमडापूर पोलिसांनी आरोपी सावकारास बेड्या ठोकल्या असून, या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तापसानंतर आणखी आरोपी वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.