मुंबई: आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाच्या सोहळ्याला (Ranbir Alia Wedding) त्यांचे जवळचे नातेवाईक आणि खास मित्र उपस्थित होते, त्यापैकी एक निर्माता करण जोहर (Karan Johar) देखील होता. करणने रणबीर आणि आलिया यांच्या मेहंदीच्या कार्यक्रमातील त्याच्यासोबत घडलेला एका किस्सा सांगितला आहे. करणने खुलासा केला की या कार्यक्रमादरम्यान तो Opps Moment ला बळी पडला होता.
करणने सांगितला रणबीर आलियाच्या मेंहदीतील Oops Moment;
करणाने एका शोमध्ये सांगितले की, 13 तारखेला आलिया रणबीरचा मेहंदीचा कार्यक्रम होता. यामध्ये करणाने गुलाबी रंगाची शेरवानी परिधान केली होती. करणने सांगितले- 'यावेळी मी पहिल्यांदा मेहंदी लावली होती. मी कधीच हातावर मेहंदी लावत नाही. तसेच त्यावेळी ऊनही खूप होते. त्यामुळे माझ्या हातावर मेहंदी लावली आहे हे मी विसरलो अन् मी माझ्या चेहऱ्यावर तोच हात लावला! अन् मग काय... माझ्या हातावर जी मेहंदी होती ती सर्व माझ्या डोक्यावर केसावर, कपड्यांवर लागली. हे सर्व लक्षात आल्यावर त्वरित मी ते स्वच्छ करणासाठी धावलो. हा सर्व प्रकार पाहून आलियाच्या मेकअप आर्टिस्टने मला रुममध्ये नेले आणि माझ्यावर पटकन कोणतेतरी लोशन लावले. नाहीतर पूर्ण मेहंदीचा रंग माझ्या वर चढला असता!'
करण जोहर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दोघांच्या खूप जवळ आहे. करणने आलिया भट्टला 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून लॉन्च केले. आलिया म्हणते करण माझा मेंटॉर आहे. त्याचबरोबर करणची रणबीरसोबत खूप घट्ट मैत्री देखील आहे. त्यामुळे करणला दोन्ही बाजूंनी निमंत्रित होते. आलिया रणबीरच्या लग्नानंतर करण जोहरने या दोघांवर प्रेम व्यक्त केले. करण जोहरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने रणबीर कपूरला त्याचा 'जावई' म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.