Husband Wife Clash: मोबाईल ठरतोय दोघांच्या संसारातील व्हिलन; नवरा-बायकोतील वादाचा चक्रावून टाकणारा अहवाल

Husband wife Clash Reason: सोशल मीडियाचा अतिवापर केल्याने अनेक वाद निर्माण होत आहे. व्हॉटस्अॅप, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक संसारातील भांडणाची कारणे बनत चालली आहे.
Husband and wife clash Reason Social Media Active Shocking Report Chhatrapati Sambhajinagar
Husband and wife clash Reason Social Media Active Shocking Report Chhatrapati Sambhajinagar Saam TV
Published On

नवनीत तापाडिया, साम टीव्ही

Husband Wife Clash Shocking Report: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यातच सोशल मीडियाचा अतिवापर केल्याने अनेक वाद निर्माण होत आहे. व्हॉटस्अॅप, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक संसारातील भांडणाची कारणे बनत चालली आहे.

सोशल मीडियावर फॉलोवर्स, फ्रेंड का वाढले, असं म्हणत नवरा-बायकोमध्ये (Husband Wife Clash) वाद होत असल्याचं समोर आलं आहे. इतकेच नव्हे तर यातून काही प्रकरणे चक्क घटस्फोटापर्यंत देखील गेल्याचे देखील समोर आले आहे.

Husband and wife clash Reason Social Media Active Shocking Report Chhatrapati Sambhajinagar
Maharashtra Rain Alert: राज्यात पुढील ४ ते ५ दिवस धो-धो पाऊस बरसणार, मुंबईसह १७ जिल्ह्यांना अलर्ट जारी

सोशल मीडियाने तरुणाईसह अनेकांना वेड लावले. याचा वापर करून अनेकांनी व्यवसायाला गती दिली. तर नवीन ट्रेनच्या माध्यमातून काहींचा आर्थिक स्तर देखील उंचावला आहे. दुसरीकडे याचे दुष्परिणाम देखील मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत.

सोशल मीडियावर (Social Media) रील्स का बनवतेस? तुझे इन्स्टाचे फॉलोवर्स, फेसबुकचे मित्र कसे वाढले? असे म्हटल्यावरून पती-पत्नीमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नवविवाहित जोडप्यांमध्ये देखील सोशल मीडियामुळे वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे.

यातील काही प्रकरणे तर चक्क घटस्फोटापर्यंत गेल्याचे देखील समोर आले आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात १ जानेवारी २०२३ ते १ जून २०२३ या सहा महिन्याच्या कालावधीत ९२७ पती-पत्नीच्या तक्रारी महिला सहाय्यक अक्षाकडे आल्या आहेत.

Husband and wife clash Reason Social Media Active Shocking Report Chhatrapati Sambhajinagar
Gold Silver Price Today: अधिकमास सुरू होताच सोन्याच्या दरात घसरण, चांदीचा भाव मात्र वाढला; जाणून घ्या आजचे दर

धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी ३० हून अधिक तक्रारी या सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आल्याचे समोर आले आहे. व्हाट्सअप वर मित्र मैत्रिणीची चॅटिंग केल्याच्या संशयावरून अनेक प्रकरणे घटस्फोटापर्यंत देखील केली आहेत.

तसेच इंस्टाग्राम वर व्हिडिओ का टाकतेस, डान्सचे रिल्स का अपलोड करते, फॉलोवर्स कसे काय वाढले अशा कारणांवरून पती-पत्नीचे वाद विकोपाला जात आहेत. पतीच्या हातातून मोबाईल (Mobile Use) सुटत नसल्याच्या तक्रारी देखील महिला सहाय्यक कक्षाकडे आल्या आहेत. पती-पत्नीसाठी मोबाईल जेवढं संवादासाठी महत्त्वाचे उपकरण आहे.

तेवढेच आता त्यांच्या भांडणाचे कारण बनत चालले आहे , त्यामुळे महिला तक्रार निवारण केंद्राच्या तक्रारीनुसार येणाऱ्या दिवसात सोशल मीडियामुळे पती-पत्नीचे घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले तर आश्चर्य वाटायला नको, त्यामुळे आता सोशल मीडियाचा आपल्या संसारात किती अतिरेक होऊ द्यायचा हे पती-पत्नीनेच ठरवलेलं बरं.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com