'चर्चेत राहाण्यासाठी पवार साहेबांवर टीका'; गृहमंत्र्याचा राज ठाकरेंना टोला

गेली पन्नास वर्ष राजकारणात शरद पवारांना पाहिलं तर त्यांनी शाहू, फुले, आंबेडकरांच्या भूमिकांचा पुरस्कार केला आहे.
'चर्चेत राहाण्यासाठी पवार साहेबांवर टीका'; गृहमंत्र्याचा राज ठाकरेंना टोला
'चर्चेत राहाण्यासाठी पवार साहेबांवर टीका'; गृहमंत्र्याचा राज ठाकरेंना टोलाSaam TV
Published On

रश्मी पुराणिक -

पुणे : चर्चेत राहायचं तर कोणत्याही नेत्याला पवार साहेबांवर (Sharad Pawar) टीका करावी लागते त्याशिवाय टिव्हीमध्ये हेडलाईन बनत नाही असा टोला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) लगावला आहे. गेली पन्नास वर्ष राजकारणात शरद पवारांना पाहिले तर त्यांनी शाहू, फुले, आंबेडकरांच्या भूमिकांचा पुरस्कार केला आहे. प्रत्येक जातीतील, समजातील घटकाला त्यांनी न्याय मिळवून देण्यासाठी काम केलं आहे. मात्र, चर्चेत राहायच असेल तर पवार साहेबांवर टीका केली जाते त्याशिवाय टिव्हीमध्ये हेडलाईन बनत नाही असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला. साम टिव्हीच्या लिडींग आयकॅान्स ॲाफ महाराष्ट्र या पुरस्कार सोहळ्यात त्यांनी राज ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि शरद पवार जातीय राजकारण करतात यावर प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलं. (Sam TV's Leading Icons of Maharashtra)

ते पुढे म्हणाले, किरीट सोमय्यांना (Kirit-Somaiya) माहिती कुठून मिळते माहित नाही. याआधी आयकर रेड झाली ते प्रेस रिलीज येत नव्हती. आता ईडी, आयकर रेड झाली की प्रेस रिलीज येते. काँग्रेस, राष्ट्रवादी, आणि शिवसेना यांचेच गैरव्यवहार आहेत आणि भाजपमधीले धुतलेल्या तांदळाचे आहेत का? त्यांच्यावर का रेड होत नाही. असा सवालही गृमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केला.

'चर्चेत राहाण्यासाठी पवार साहेबांवर टीका'; गृहमंत्र्याचा राज ठाकरेंना टोला
अजान, हनुमान चालीसासाठी भोंगे लावा, मात्र नियम पाळून - गृहमंत्री

तसचं या सर्व यंत्रणानी ममता बॅनर्जींना (Mamata Banerjee) त्रास दिला तरी त्या पुरून उरल्या, यामध्ये जास्त तर्क लावायची गरज नाही असही ते म्हणाले. राज्यातील व्यवस्थेवर राष्ट्रवादी भाजपबाबत सॉफ्ट आहे का ? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, केंद्रीय यंत्रणांचा वापर चुकीचा होत आहे, म्हणून मी तसंच वागलं पाहिजे असं नाही. जिथे चूक असेल दोषी असेल जरूर गेलं पाहिजे. तसंच केंद्रातील अधिकार आणि राज्याचे अधिकार यामध्ये फरक आहे. त्यांचं जे चाललं आहे, आम्ही देखील ते केलं पाहिजे अस मला वाटत नाही. जिथे चुका झालं कायदेशीर बाबींचा तपास करून कारवाई केली जाईल असही गृहमंत्री म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com